Ajit Pawar : 'मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा माणूस?' अजित पवारांनी पुन्हा काढला वयाचा मुद्दा

अजित पवार यांनी बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन कारखाना सभासदांना केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे 

येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंगलं जाणार आहे. राजकीय पक्षांकडून याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा वयाचा मुद्दा काढला आहे. मी चांगलं काम करू शकेल की 85 वर्षाचा माणूस चांगलं काम करू शकेल, असं म्हणत अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विरोधक चंद्रहार तावरे यांना टोला लागवला आहे.

नक्की वाचा - BIG NEWS: भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या घरात शेतकरी घुसला, घर जाळण्याचा ही प्रयत्न

अजित पवारला पैशांची गरज नाही, बाप जाद्याच्या कृपेने बर चाललं आहे. मी सत्तेला हापापलेलो नाही. मी चांगलं काम करेल का 85 वर्षांचा माणूस चांगलं काम करेल? असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. कारखाना निवडणुकीतील विरोधक असलेल्या 85 वर्षे वयाच्या चंद्रराव तावरे यांना अजित पवारांनी टोला लगावल्याचं सांगितलं जात आहे. 

Advertisement

यापूर्वीही अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांविरोधात हाच मुद्दा उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून वयाचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे.