मुंबई: मुंबईतील मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा पेटला आहे. मुंबईतील अल्पसंख्यांक आमदारांचे शिष्टमंडळ यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या पोलिसां विरोधात असलेल्या तक्रारी मांडल्या. मात्र या बैठकीत पोलिसांच्या तक्रारी तर केल्याच पण भाजप नेते किरीट सोमय्या यांची देखील तक्रार केली गेली.
BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा
समोर आलेल्या माहितीनुसार, मशीदीवरील भोग्यांचं डेसिबल हे न्यायालयाने घालून दिले आहेत. 45-56 डेसिबलच्या मध्ये आवाज असला पाहिजे. त्याच्यावर भोंग्यांचा आवाज जाता कामा नये. मात्र पोलीस जबरदस्ती भोंगे उतरवत आहेत. आतापर्यंत मुंबईत 1500 भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत. मात्र पोलीस जबरदस्ती वस्त्यांमध्ये येत आहेत आणि भोंगे उतरवायला लावत आहेत. हे जे 1500 भोंगे उतरवले गेले आहेत.मात्र सर्व मशीद प्रमुख आणि पोलिसांमध्ये समन्वय साधूनच काढले गेले आहेत. तरीही न्यायालयाने भोंगे उतरवण्याचे आदेश दिलेले नाहीत असं मत अल्पसंख्याक आमदारांच आहे.
या बैठकीत पोलिसांना सहकार्य करण्याची भावना आमदारांनी दर्शवली आहे. परंतु जबरदस्ती करू नका असं देखिल यांचं म्हणणं आहे. या सगळ्यात सरकार सगळ्यांचं म्हणणं ऐकून योग्य तो निर्णय घेईल अशी भूमिका अजित पवारांनी या बैठकीत मांडली आहे.
( नक्की वाचा : Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश )
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या हे वारंवार जाणूनबुजून मशीदी वरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत आहेत आणि तणावाच वातावरण बिघडवत आहेत अशी तक्रार या शिष्टमंडळाने केली. मात्र अजित पवार यांनी आधीच सोमय्या यांना तंबी दिली असून ते आता कुठल्याही मशीदीत जाणार नाही आणि जर तक्रार असेल तर की पोलीस स्थानकात करतील असे अजित पवारांनीसांगितले. आधीच दिलेल्या या तंबीची आज पुन्हा अजित पवार यांनी आठवण करुन दिली.