जाहिरात

'वापस आना पडता है...'; स्थळ नागपूर अन् फडणवीसांच्या त्या होर्डिंगवरील कवितेची राज्यभरात चर्चा

नागपुरातील एका होर्डिंगने देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत.

'वापस आना पडता है...'; स्थळ नागपूर अन् फडणवीसांच्या त्या होर्डिंगवरील कवितेची राज्यभरात चर्चा

संजय तिवारी, प्रतिनिधी

5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार असल्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं आहे. शपथविधीची तारीख ठरली असली तरी नावांची घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरातील एका होर्डिंगने देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. 'फडणवीस हेच परत येताहेत...', नागपुरात अशा आशयाचे होर्डिंग लागले आहे.  सध्या या होर्डिंगची नागपुरात मोठी चर्चा सुरू आहे. फिर वापस आना पडता है...लिहिलेल्या या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीसांचे पाठमोरे चित्र आहे. 

Shrinkat Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

नक्की वाचा - Shrinkat Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

काय लिहिलंय त्या होर्डिंग्जवर?
वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है...
पत्थर की बंदिश से भी क्या बहती नदियां रुकती हैं..
हालातों की धमकी से क्या अपनी नजरें झुकती हैं..
किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पडता है..
जिसमें मशाल सा जजबा हो वो दीप जलाना पडता है..
वापस आना पडता है फिर वापस आना पडता है..

दरम्यान हे होर्डिंग्ज कोणी लावलं याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही. मात्र पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील या चर्चेला राज्यभरात उधाण आलं आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com