Dharashiv News: "लग्न कर नाही तर...", छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या

Dharashiv News : या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

धाराशिवच्या तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने केली गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत राहत्या घरी तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं.  सारिका असे आत्महात्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

"माझ्यावर  प्रेम कर , लग्न कर नाही तर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेल आरोपीने अशी धमकी दिल्याने 15 वर्षीय मुलीने घेतला टोकाचा निर्णय घेतला. आरोपीने मुलीला बंदुकीने मारण्याची धमकी होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पूर्वीचाही गुन्हा दाखल आहे.

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येनंतर सोनमनं 17 दिवस काय केलं? वाचा Inside Story )

सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

एका विवाहित महिलेने सावकाराच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी येथे ही घटना आहे. वडडी येथील राहत्या घरात सुलोचना मैत्री यांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुलोचना यांनी चिठ्ठी देखील लिहिली. सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांना चिठ्ठीत नमूद केल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान याघटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article