Dharashiv News: हातात कोयता घेऊन भर चौकात तरुणाची दहशत! ट्राफीक रोखले, हातवारे केले, पुढे जे घडले ते...

तो रस्त्याच्या मधोमध उभा होता. त्याच्या हातात मोठा कोयता होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

ओंकार कुलकर्णी 

हल्ली स्टंट करून दहशत माजवण्याची जणू स्टाईल झाली आहे. अनेक स्वयंम घोषीत दादा आपल्या रिल्स बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असता. त्यासाठी मग कुणी हातात गन घेतं, तर कुणी कोयता घेतं. अशा भाईंना पोलीसांनी अद्दल घडवल्याच्या घटना ही घडल्या आहेत. मात्र तरी ही त्यांना काही आळा बसला नाही. अशी दहशत माजवण्याचे प्रकार राज्यात कुठेना कुठे घडतच आहेत. असाच एक प्रकार आता धाराशीवमध्ये समोर आला आहे. त्याचा व्हिडीओ ही जोरदार व्हायरल होत आहे. यात एक तरुणी भर रस्त्यात कोयता घेवून धमकावत आहे.  

धाराशीव शहरातील बार्शी नाका या वरदळीच्या चौकात आज रविवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. हातात कोयता घेऊन एक तरुण चौकात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. तब्बल पंधरा मिनिटे तो रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना धमकावत होता. तो कोयत्याचे वार करण्याचा प्रयत्न करत होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिक आणि प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.

नक्की वाचा - Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी जमीन, शेतकऱ्यांनी प्रती एकर 1 कोटी नाही तर मागितले 'इतके' कोटी

तो रस्त्याच्या मधोमध उभा होता. त्याच्या हातात मोठा कोयता होता. अचानक तो हल्ला करेल याची भीती लोकांना होती. तशा पद्धतीने तो हातवारेही करत होता. त्यामुळे त्या रस्त्यावरून येणारी जाणारी वाहतूक काही वेळासाठी त्याच्या पासून लांब अंतरावरच थांबली होती. लोक हा सर्व प्रकार पाहात होते. पण त्याला रोखण्यासाठी पुढे जाण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. बघ्याचीं ही मोठी गर्दी तिथे जमली होती. त्याच वेळी धाराशीव पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

नक्की वाचा - Shirdi News: शिर्डीत ‘चमत्कार'? साईबाबांच्या दर्शनानंतर अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा, अनिसचं म्हणणं काय?

ही माहिती मिळताच धाराशीव पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तो तरूण तिथे हातात कोयता घेवून तिथे दहशत निर्माण करत होता. पोलीसांनी अतिशय धाडसाने त्या तरूणाला नियंत्रणात केले. त्याच्या हातून कोयता हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर या तरुणीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण परसरले होते. काही काळ धाराशिवच्या बार्शी नाका चौकात हा थरार पाहायला मिळाला. 

Advertisement