ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Tuljabhavani Temple Darshan News: महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकाचं श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविकांच्या दर्शन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. गुरुवारपासून ही नवी दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली असून सर्व भाविकांना समान अंतरावरुन देवीचे दर्शन मिळेल अशी रचना करण्यात आली आहे.
Bhiwandi News: भिवंडीत धक्कादायक घडलं! उलट्या, पोटदुखी, मळमळ... 14 जण रुग्णालयात, आता FDA देणार दणका
तुळजा भवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल
समोर आलेल्या माहितीनुसार, आई तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलानंतर आता सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी व्हीआयपी पास करणाऱ्या भाविकांना आई तुळजाभवानीच्या जवळून दर्शन व्हायचं त्यामुळे तासंतास रांगेत उभारलेल्या सर्वसामान्य भाविकांना देवीचे दर्शन घेताना अडचणी निर्माण होत होत्या.
आता विशेष व सशुल्क दर्शनासाठी असलेले स्वतंत्र मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंदिर संस्थानच्या म्हणण्यानुसार दर्शनासाठी कोणालाही प्राधान्य दिले जाणार नाही आणि सर्वांना एकाच रांगेतून अंतरावरून घेता येणार आहे.
नव्या व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून भाविकांना कमी वेळेत आणि अधिक सुलभपणे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता यावे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच देणगी किंवा शुल्क दर्शनाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचेही मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world