जाहिरात

Tuljapur News: तुळजापुरात तापले वातावरण! मंदिर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; भाजपा नगराध्यक्षांचे बंधू अडचणीत

Shri TuljaBhavani Temple : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

Tuljapur  News:  तुळजापुरात तापले वातावरण! मंदिर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; भाजपा नगराध्यक्षांचे बंधू अडचणीत
Tuljapur News: या घटनेनंतर मंदिर संस्थानच्या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
तुळजापूर:

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Shri TuljaBhavani Temple : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुळजापूरचे भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचे बंधू विजय गंगणे यांच्यावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंदिर संस्थानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर कामबंद आंदोलन पुकारल्याने तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी ते आपले नियमित काम करत असताना विजय गंगणे यांनी त्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि धमकावले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. तसेच या घटनेनंतर मंदिर संस्थानच्या परिसरात प्रचंड भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

( नक्की वाचा :राज्यातील 3 मोठ्या तीर्थक्षेत्रांचा चेहरामोहरा बदलणार! फडणवीस सरकारकडून 115 कोटींचा निधी मंजूर )
 

दिवसभर काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची भेट घेतली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपलं गाऱ्हाणं सांगत एक निवेदन सादर केले. संबंधित आरोपी विजय गंगणे याच्याविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची ठाम मागणी कर्मचाऱ्यांनी या निवेदनातून केली आहे.

Latest and Breaking News on NDTV

संस्थानचे कामकाज ठप्प; प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

या आंदोलनात मंदिर संस्थानच्या वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या अचानक केलेल्या कामबंद आंदोलनामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानातील वातावरण चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता प्रशासन नेमकी काय पावले उचलणार आणि आरोपीवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com