जाहिरात

Sidhi vastre News: शिंदेंच्या रणरागिणीची कमाल! अवघ्या 22 वर्षी नगराध्यक्षा; कोण आहे सिद्धी वस्त्रे?

Mohol municipal councils election Result: मोहोळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढणाऱ्या रणरागिणीने अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्षपद मिळवले आहे.

Sidhi vastre News: शिंदेंच्या रणरागिणीची कमाल! अवघ्या 22 वर्षी नगराध्यक्षा; कोण आहे सिद्धी वस्त्रे?

Mohol Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील 288 नगरपरिषद तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यापैकी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या निकालाची राज्यात चर्चा होत आहे. मोहोळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढणाऱ्या रणरागिणीने अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्षपद मिळवले आहे.

 मोहोळमध्ये शिवसेनेचा करिष्मा..

सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र असलेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा १७० मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, सिद्धी वस्त्रे या केवळ २२ वर्षांच्या असून, राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षांपैकी एक ठरल्या आहेत.

Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो'

​मोहोळ नगरपरिषदेच्या एकूण २० जागांपैकी ९ जागांवर शिवसेनेने (शिंदे गट) विजय मिळवला आहे. महायुतीमध्ये एकत्र असूनही स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने ठाकले होते. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सिद्धी वस्त्रे यांच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला संधी देऊन शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे.

सिद्धी वस्त्रे 22 व्या वर्षी नगराध्यक्षा..

​विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धी वस्त्रे यांनी जनतेचे आभार मानले. "जनतेने दिलेला हा कौल माझ्यावरील विश्वास दर्शवतो. निवडणुकीच्या काळात अनेक टीका झाल्या, पण आजचा निकाल हेच त्या टीकेला उत्तर आहे. लोकांच्या समस्या सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हीच माझी प्राथमिकता असेल," असे त्यांनी स्पष्ट केले. या निकालामुळे मोहोळमधील भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा- Amravati Election: चिखलदऱ्यात काँग्रेसचा भाजपला धक्का, शेख अब्दुल शेख हैदर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com