जाहिरात

Maharashtra Election: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मुनगंटीवार ते रोहित पाटील.. गावगाड्यात दिग्गजांचे गड ढासळले!

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक दिग्गजांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Maharashtra Election: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मुनगंटीवार ते रोहित पाटील.. गावगाड्यात दिग्गजांचे गड ढासळले!

Maharashtra Local Body Election Result:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पडले असून, मतदारांनी प्रस्थापितांना नाकारून बदलाचा कौल दिला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक दिग्गजांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

सुधीर मुनगंटीवार, नितेश राणेंना धक्का...

चंद्रपुरात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला असून, मूल नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकता समर्थ यांनी विजय मिळवला आहे. ​कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांना मालवण आणि कणकवली या दोन्ही ठिकाणी मोठा झटका बसला आहे. कणकवलीत शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांनी अवघ्या १५० मतांनी विजय मिळवत नितेश राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने येथे भगवा फडकवला आहे. सावंतवाडीत भाजपने जरी विजय मिळवला असला, तरी राजघराण्यातील श्रद्धाराजे भोसले यांच्या विजयाने मंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Nanded Nagar Parishad Result 2025 : नांदेडमध्ये भाजपाचा मोठा जुगार अंगलट, एकाच घरातील 6 जण एकाच वेळी पडले!

रक्षा खडसे, ओमराजेंचाही पराभव

​उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपला केवळ ४ जागा मिळाल्या असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) संजना पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. धरणगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना ठाकरे गटाच्या लिलाबाई चौधरी यांनी पराभूत केले आहे. मराठवाड्यात धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून, भाजप आणि शिवसेनेने येथे प्रत्येकी ४ ठिकाणी विजय मिळवला आहे.

संग्राम थोपटे, रोहित पाटील यांनाही धक्का

त्याचबरोबर  संग्राम थोपटे आणि भाजपला भोरमध्ये मोठा धक्का बसला असून भोर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाली आहेत. तासगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटलांना धक्का बसला आहे. याठिकाणी माजी खासदार संजय काका पाटलांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.  भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे, अंबडमध्ये राजेश टोपे, तर परतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का बसला आहे. 

Sidhi vastre News: शिंदेंच्या रणरागिणीची कमाल! अवघ्या 22 वर्षी नगराध्यक्षा; कोण आहे सिद्धी वस्त्रे?

दरम्यान, भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी  रजनी सावकारे यांचा पराभव झाला आहे. भुसावळमध्ये रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा  घेतली होती. मुख्यमंत्र्यांची सभा होऊनही भुसावळमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com