Dhule News : समोसा खाल्ल्याने महिलेची प्रकृती बिघडली, नवऱ्याने समोसा तपासला तेव्हा धक्काच बसला

धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनयना पाटील यांनी जयहिंद कॉलेज जवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉप मधून पफ समोसाची खरेदी केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे

Dhule News : धुळे शहरातील साक्रीरोडवरील बालाजी स्वीट येथे समोसामध्ये झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच आता देवपुरातही असाच प्रकार घडला आहे. जयहिंद कॉलेज जवळील बेकर बास्केट या शॉपमधून पफ समोसा खरेदी करुन खाल्ल्याने गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली आहे. या महिलेच्या पतीने पफ समोसाची पाहणी केल्यानंतर त्यात अनेक कीडे वळवळताना आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनयना पाटील यांनी जयहिंद कॉलेज जवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉप मधून पफ समोसाची खरेदी केली होती. समोसे घरी आणून त्यांनी खाल्ले, त्यानंतर त्यांना उलट्या व जुलाब होऊ लागले. 

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )

त्यामुळे सुनयना पाटील यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. सदरील महिला ७ महिन्याच्या गरोदर असून त्यांना अधिक त्रास होत होता. त्यावेळी त्यांचे पती किरण पाटील यांनी खरेदी केलेले खाद्यपदार्थ तपासले. यावेळी पफ शिळा व चिकट असल्याचे जाणवले. 

(नक्की वाचा - Beed News : लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण)

शिवाय या पफच्या आतमध्ये कीडे आढळून आले. पफ खाल्ल्यानेच पत्नीची तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खाद्यपदार्थ घेवून शॉप मालक पराग पाटील यांना जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवी उत्तरे दिली. गंभीर प्रकार घडलेला असताना शॉप मालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने किरण पाटील यांनी याबाबत अन्न व औषध विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. भेसळयुक्त व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी किरण पाटील यांनी केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article