निकालाआधीच विजय फिक्स; 'या' 10 दिग्गजांचे बॅनर्सही झळकले!

23 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून अनेक दिग्गज उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. दुसरीकडे काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजय फिक्स असल्याचा दावा करत निकालाआधीच बॅनर्स झळकावले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकांच्या सभांचा  धडाका अन् प्रचाराचा धुरळा आता शांत झाला आहे. राज्याच्या राजकारणात आता विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. 23 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून अनेक दिग्गज उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. दुसरीकडे काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजय फिक्स असल्याचा दावा करत निकालाआधीच बॅनर्स झळकावले आहेत. कोण आहेत असे नेते? वाचा सविस्तर....

दिलीप वळसे पाटील: आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असा विधानसभा निवडणुकीत चुरशीचा सामना रंगला अटीतटीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली असतानाच मतदारसंघातील पाबळ येथे निवडणूक निकालापूर्वीच वळसे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत,निवडणूक निकालाला काही तास बाकी असतानाच निकालापूर्वीच हे बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत.

हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे: इंदापूर विधानसभेची  मतमोजणी होण्यापूर्वीच पुण्याच्या इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. भरणे आणि पाटील यांची इंदापूर विधानसभेवर प्रचंड मताधिक्क्याने निवड झाल्याबद्दल अभिनंदन असे हे बॅनर आहेत. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

नक्की वाचा: अपक्ष अन् बंडखोरासाठी तगडी फिल्डिंग! भाजपने डाव टाकला; 'या' 8 नेत्यांकडे मोठी जबाबदारी

मंगेश चव्हाण: चाळीसगावमध्ये निकालापूर्वीच भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर धडकले असून कार्यकर्त्यांकडून चाळीसगाव शहरात ठिकठिकाणी मंगेश चव्हाण यांच्या विजयाच्या अभिनंदन लावण्यात आले आहे. निकालाला एक दिवस बाकी असतानाच कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र फास्ट गेला पोहचल्याच पाहायला मिळत असून निकालापूर्वीच मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर जळकल्याने राजकिय वर्तुळात ही याची चर्चा चांगली आहे.

Advertisement

गजानन लवटे: निवडणूक निकालापूर्वीच अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.  गजानन लवटे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे गजानन लवटे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे अभिजीत अडसूळ आणि युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले यांच्यात लढत झाली होती.

सुरेश धस: बीडच्या आष्टी मतदार संघात निकालापूर्वीच भाजपा उमेदवार सुरेश धस यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. या बॅनरवर सुरेश धस यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख देखील करण्यात आलाय. आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश धस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत झाली. 

Advertisement

महत्वाची बातमी: महायुतीला किती जागा? चंद्रकांत पाटील यांनी नेमका आकडा सांगितला

शिवेंद्रराजे भोसले: विधानसभेच्या निकालाआधी साताऱ्यातही पोस्टरबाजी सुरु झाली आहे. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये महाराज साहेब अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. हा पोस्टर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

तानाजी सावंत: परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. तानाजी सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते.   महायुतीच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते, कार्यकर्त्याकडून विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला जात असून त्यांचेही विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. त्यांच्यासमोर  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचे मोठे आव्हान होते. 

Advertisement

माणिकराव ठाकरे: यवतमाळ जिल्ह्यातील सातह विधानसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होणार आहे. मात्र जिल्ह्याच्या दारव्हा येथे अति उत्साही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  माणिकराव ठाकरे यांचे आमदार म्हणून बॅनर मतमोजणीच्या आधीच लावण्यात आले. कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही. हा मतदारसंघ आमचा आणि आमदार ही आमचा, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. 

संभाजी पाटील निलंगेकर:  लातूरच्या निलंगा मतदार संघात निकालापूर्वीच संभाजी पाटील निलंगेकर यांचे विजयाचे बॅनर झळकले आहेत.निलंगा मतदार संघातल्या देवणी येथे उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाच्या एक दिवस आधीच संभाजी पाटील निलंगेकरांचे विजयाचे बॅनर लावले आहेत.. तर संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत....

  ट्रेंडिंग बातमी: 'सत्ता स्थापनेचा दावा अन् CM पद...', काँग्रेसचे नेते स्पष्ट बोलले; पडद्यामागे काय शिजतंय