सागर कुलकर्णी, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता 23 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उद्या निकाल लागणार असून आजपासूनच राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडत असतानच काँग्रेसकडूनही महत्वाची मिटींग आयोजित करण्यात आली आहे.
विधानसभेच्या निकालाआधी काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांची महत्वाची मिटिंग पार पडली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश चेन्निथला यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
निकालआधी सर्व काँग्रेस नेत्यांशी बैठक घेण्यासाठी ही मिटींग घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हरियाणामध्ये ज्याप्रमाणे भाजपने घोळ घातला तो टाळण्यासाठी उमेदवारांना दक्ष राहण्याच्या सुचना दिल्याचेही रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले.
नक्की वाचा: महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्यातील महायुतीचे सरकार घालवणे हेच आमचे पहिले लक्ष आहे. उद्या मतदान झाल्यानंतर हायकमांड जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमचे सरकार स्थापन होणार असून अपक्षही आम्हाला मिळतील, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. उद्या बारापर्यंत पिक्चर क्लिअर होईल, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे महाविकास आघाडीला 175 च्या आसपास जागा मिळतील आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे,शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता उद्या येणाऱ्या निकालानंतर राज्यात सत्तेत कोण बसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाची बातमी: 'जाहीर माफी मागा अन्यथा', विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंंना नोटीस!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world