Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्वीस्ट! माझ्या मुलीची हत्या.. वडिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप

Disha Salian Death Case: दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याची एनआयए चौकशीची मागणी करत यावर लवकर सुनावणी अपेक्षित असल्याची विनंती त्यांनी केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याच शक्यता आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आता तिच्या आई- वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली असून नव्याने चौकशीची मागणी करत याचिका दाखल केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून दिशाचे वडील सतीश सालियन यांची नव्याने चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याची एनआयए चौकशीची मागणी करत यावर लवकर सुनावणी अपेक्षित असल्याची विनंती त्यांनी केली आहे. 

दिशा सालियनच्या वडिलांनी  याप्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिका-याच्या देखरेखीखाली करण्याची मागणीही या याचिकेतून केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिशा सालियनच्या वडिलांनी या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर यांच्यासह अभिनेता आदित्य पांचोली आणि दिनो मौर्यावरही गंभीर आरोप केले आहेत. 

नक्की वाचा-  Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)

मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे. तसेच  त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप करत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा याचिकेतून दावा या याचिकेत करण्यात आला आहे. 

Advertisement

दरम्यान, दरम्यान, यावरुनच मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आदित्य ठाकरेंचं लोकेशन तपासा. आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल पेटीशन दाखल केली आहे. त्यांनी सत्य सांगितले आहे. सीएमच्या मुलाला वाचविण्यासाठी काय काय केलं हे दिशा सालियानच्या वडिलांनी सांगितलं आहे. तुमच्या कलानगरमध्ये मोठा शक्ती कपूर बसलाय त्याला आवरा, आता त्याला कळेल चौकशी काय असते.. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!