
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईसह पुणे, नाशिक नागपूरमधील टोळक्यांचा हैदोस, संतोष देशमुख हत्या प्रकरण, महिला अत्याचाराच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरुनच आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही घमासान झाले. ज्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर स्पष्टीकरण देत संपूर्ण आकडेवारीच मांडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
"महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि स्थैर्य असलेले राज्य आहे. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना होत असतात. घटना घडल्यानंतर त्याला आपण कसा प्रतिसाद देतो हे महत्त्वाचे आहे. जगाच्या पाठीवर असे कोणतेही राष्ट्र नाही जिथे गुन्हे घडत नाहीत. मात्र गुन्हे घडल्यानंतर आपण कारवाई करतो की नाही? हा खरा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. आणि किती गुन्हे घडले यापेक्षा सेफ्टीचे परसेप्शन काय हे महत्त्वाचे असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच "देशामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची तुलना केली तर गुन्हेगारीमध्ये आपला क्रमांक आठवा आहे. शहरांमध्ये नागपूरचा नंबर सातव्या क्रमांकावर आहे. पण तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये कोणतेही शहर नाही. त्यामुळे तुलनेने महाराष्ट्रातील शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारची असल्याचा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
'2024 मध्ये 2023 शी तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2280 ची घट आहे. त्यामध्ये चोरी दंगलचा समावेश आहे. तर काही गोष्टींची वाढ झाली असून ज्यामध्ये विनयभंग आणि बलात्काराचा समावेश आहे. निर्भयानंतर आपण क्राईमची व्याख्या बदलल्या. 2013 साली आपण विनयभंगाच्या कलमाची घटनाही बलात्काराचे कलम लावतो. तसेच कोणतीही तक्रार आली तर आधी रजिस्टर करायची प्रक्रिया फ्री केली. 2013 पासून एकही वर्ष असे नाही, ज्यामध्ये दरवर्षात वाढ होताना दिसत आहे. मात्र समाजामध्ये त्या घटनांची नोंद करण्याचे प्रमाण वाढल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
"अत्याचाराच्या तक्रारी वाढत असल्या तरी यामध्ये महिला बोलू लागल्या आहेत हे महत्त्वाचे आहे. या घटनांचे चार्जशीटही आपण अत्यंत वेगाने दाखल करतोय. 90 टक्के केसेसमध्ये आपण 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करतोय. यामध्ये रायगड पोलीस आणि कोर्टाचे अभिनंदन करायचे आहे. मागच्या आठवड्यात रायगडमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, त्यानंतर अवघ्या 48 तासात चार्जशीट दाखल करुन गुन्हेगाराला शिक्षाही दिली," अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
(नक्की वाचा- Matheran News : माथेरान आजपासून बंद! पर्यटकांसाठी स्थानिकांनी उचलला आवाज)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world