अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRFने सतर्क राहावे - CM एकनाथ शिंदे 

बईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी (21 जुलै) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

Mumbai Rain Alert: मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी (21 जुलै) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अलर्ट राहा - मुख्यमंत्री शिंदे

सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

(नक्की वाचा: खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच हाती घ्यावे लागले फावडे-घमेले)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या या सूचना 

- दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. 

- बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी.

(नक्की वाचा: ग्रँट रोडमध्ये इमारतीचा भाग कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू)

- पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी.

- हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्ट्स (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. 
पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. 

- पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी. 

- सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

Bhandara Rain | भंडाऱ्यात सकाळपासून मुसळधार पाऊस, सखल घरांमध्ये शिरलं पाणी  

Topics mentioned in this article