Pune Dive Ghat Closed: दिवे घाटातील वाहतूक उद्या 3 तास बंद राहणार, काय आहेत पर्यायी मार्ग ?

विष्यातही ब्लास्टिंगचे काम असेल, तेव्हा रस्ता बंद राहील आणि वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर (Palkhi Marg) सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे, शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) ही माहिती दिली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामामुळे हडपसर ते दिवेघाट या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन NHAI ने केले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत येतो. यापूर्वीही, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात आले होते आणि त्यावेळीही रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

नक्की वाचा: पुणे पोलिसांची 2 मसाज सेंटरवर धाड; बंद खोलीत सुरु होता भलताच प्रकार

वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग

  • कात्रज-बोपदेव घाट: राज्य मार्ग क्रमांक 131 मार्गे सासवडकडे (Saswad) जावे.
  • खेडशिवापूर-सासवड लिंक रोड: या मार्गाचा वापर करता येईल.
  • कापूरहोळ-नारायणपूर: राज्य मार्ग क्रमांक 119 मार्गे प्रवास करता येईल.
  • हडपसर-उरुळी कांचन-शिंदवणे घाट: राज्य मार्ग क्रमांक 61 मार्गे सासवडकडे जाता येईल.

प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तसेच, भविष्यातही ब्लास्टिंगचे काम असेल, तेव्हा रस्ता बंद राहील आणि वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

नक्की वाचा: iPhone 17 साठी सोडली नोकरी! Gen Z कर्मचाऱ्याचं राजीनामा पत्र होतंय व्हायरल

वाकड ब्रिजवरील वाहतूक व्यवस्थेतही बदल

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरळीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दोन निर्णय जाहीर केले आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते, ज्यामुळे वाकड ब्रिजवर मोठी कोंडी होते. ही कोंडी कमी करण्यासाठी सकाळी, वाकडहून हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गासाठी तीन लेन उपलब्ध असतील असे त्यांनी जाहीर केले आहे. तर हिंजवडीहून वाकडकडे येणाऱ्या वाहनांसाठी एक लेन ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सायंकाळी कामावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हिंजवडीहून वाकडकडे येणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी होत असते, त्यामुळे सायंकाळी हिंजवडीहून वाकडकडे येणाऱ्या मार्गासाठी तीन लेन ठेवणार असून वाकड हून हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक लेन ठेवणार आहेत. या बदलामुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा दावा करण्यात येत आहे. इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी इतरही उपाय केले जात आहेत.  

Topics mentioned in this article