Traffic Jam : दिवाळीनिमित्ताने नागरिक आपल्या घरी परतत असतात. कुटुंबासोबत आनंदाने दिवाळी साजरी करण्यासाठी घरीची ओढ लागलेली असते. मात्र वाहतूक कोंडीमुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडल्याचं दिसून येत आहे. उद्या, सोमवार २० ऑक्टोबरपासून दिवाळीतील पहिली आंघोळ आहे. यासाठी मोठ्या संख्येने लोक घरी तर कुणी गावी जात आहे. त्यामुळे अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या दोन दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आजही असंच काहीसं चित्र आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. दिवाळी सुट्ट्यांमुळे कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणगावाकडे जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे सोलापूर लेनवर ट्राफिक जाम
राज्यभरात दीपोत्सव साजरा केला जातो. गेल्या दोन दिवसापासून दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक पुणेकर आपल्या मूळ गावी परतत आहेत. त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय