Nashik Diwali Festival 2025: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेले आदेश सध्या चर्चेत ठरत आहेत. फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मिटर अंतरापर्यंत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यासाठी बंदी घालण्यात आली आहे. २५ ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे, ३.८ सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीचे व ऐटमबॉम्ब नावाने ओळखले जाणाऱ्या फटाक्यांची विक्री करू नये.
तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय असे विषारी फटाके तसेच आपटीबॉम्ब उडवू नये. फटाके सुरक्षितेतच्या दृष्टीने कशी हाताळावीत, याचे योग्य प्रशिक्षण विक्रेत्यांना देण्यात यावे यांसह अनेक नियमावली घालून देण्यात आली असून आदेशाचे पालन न केल्यास आठ दिवसाची कारवासाची शिक्षा तसेच १,२५० रुपये दंडही आकारण्यात येणार आहे. या आदेशाची चोख अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि संबंधित प्रशासनाची पथकं तैनात राहणार आहेत.
काय आहे फटाके वाजवण्याची नियमावली?
- १. स्फोटक अधिनियम २००८ च्या ७८ ते ८८ नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे, तसेच फटाका उडविणाऱ्या जागेपासून ४ मिटर अंतरापर्यंत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यासाठी बंदी घालण्यात येत आहे.
- २. संबंधित परवाना प्राधिकारी यांनी फटाका परवाना देतांना तो गर्दीच्या, वर्दळीच्या, सार्वजनिक रस्त्यांवर, शाळा व महाविद्यालयाजवळ तसेच धार्मिक स्थळाशेजारी न देता इतरत्र मोकळया जागेत असेल अशा ठिकाणी देण्याची कार्यवाही करावी.
- ३. साखळी फटाक्यांसाठी (Joint Fire Crackers) वरील १ मध्ये नमूद केलेल्या आवाजाच्या मर्यादच्या पातळीत ५ Log १० (N) डेसीबल पर्यंत शिथीलता देण्यात येत आहे. ज्यात N= एका साखळी फटाक्यातील एकुण फटाक्यांची संख्या उदा. जर साखळी फटाक्यात एकूण ५० फटाके, ५० ते १०० आणि त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासुन ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११५, ११० व १०५ डेसीबल एवढी असावी.
- ४. रात्री १०.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०० वाजेपावेतो कुठलाही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी आहे. (या कार्यालयाचे आदेश क्र. कक्ष १/पिओएल-१/४८३८/२०२४ दिनांक १७/१२/२०२४ रोजी दिलेली सूट वगळून)
- ५. फटाक्यांची दुकाने जमिनीलगतच असावीत, प्रत्येक स्टॉलमध्ये ५० कि.ग्रॅ. फटाके व ४०० कि.ग्रॅ. चायनिज क्रंकर (शोभेचे फटाके) यापेक्षा जास्त साठा असणार नाही.
- ६. प्रत्येक स्टॉलमध्ये अंतर सुरक्षित असावे. तसेच कुठल्याही सुरक्षित घोषीत केलेल्या सिमेपासून ५० मिटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी
- ७. एकापेक्षा जास्त स्टॉल असतील त्यांची प्रवेशद्वारे समोरासमोर नसावीत.
- ८. एकाठिकाणी १०० पेक्षा जास्त स्टॉल नसावेत, अशाप्रकारे एकापेक्षा जास्त समूह होत असतील तर दुसऱ्या प्रत्येक सुमहातील अंतर ५० मिटर पेक्षा कमी नसावे.
- ९. स्टॉलचे ठिकाणी तेलाचा दिवा, मेणबत्ती निषिध्द आहे.
- १०. विद्युत प्रवाह वार्यारंग योग्य रितीने केलेलो आहे याकडेस विशेष लक्ष देण्यात यावे.
- ११. फटाक्याच्या दुकानाचा आपत्कालीन मार्ग हा नेहमी खुला असावा, त्यात कुठल्याही प्रकारचे अडथळे नसावे तसेच स्टॉलच्या ठिकाणी धुम्रपानास सक्त मनाई करणे बंधनकारक आहे.
- १२. फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये.
- १३. कुठल्याही प्रकारचा अपघात निर्माण होणार नाही, यासाठी योग्य ती सुरक्षाव्यवस्था व अग्निप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी.
- १४. खराब स्थितीत असलेल्या कुठल्याही फटाक्यांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
- १५. २५ ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे, ३.८ से. मीटर पेक्षा जास्त लांबीचे व ऐटमबॉम्ब नावाने ओळखले जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेली फटाके विक्री केली जाणार नाही.
- १६. तोन इंचापेक्षा जास्त लांबीचा आणि अर्ध्या इंचापेक्षा जास्त व्यासाचे कागदाचे नळीपासून केलेला गनपावडर व नायट्रेट मिश्रीत परंतु क्लोरेट नसलेला चिनी फटाक्यांची विक्री केली जाणार नाही.
- १७. फुटफुटी किवा तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखले जाणान्या पिवळा फॉस्फरसयुक्त असलेल्या अत्यंत विषारी असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणार नाही,
- १८. १८ वर्षांखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय त्यांना फटाके विक्री करु नये.
- १९. फटाका दुकानातील विक्रेते व कामगार यांना फटाक्यांच्या घातक स्वरुपाबद्दल तसेच फटाके सुरक्षितेतच्या दृष्टीने कशी हाताळावीत, याचे योग्य प्रशिक्षण द्यावे.
- २०. शांतता क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात येऊ नये, शांतता क्षेत्रात रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये इत्यादीच्या सभोवतालचे १०० मिटर पर्यंतचे क्षेत्र येते.
- २१. रॉकेट डोक्याचा भाग हा १० सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीचा नसावा व २.५ सेंटोमिटर पेक्षा जास्त जाडीचा व्यास नसावा.
- २२. मनाई केलेले आपटबार व उखळी दारु उडविण्यास बंदी आहे.
- २३. १०,००० फटाके पेक्षा जास्त लांबीच्या फटाक्यांची माळ असता कामा नये, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
- २४. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (यु) अन्वये केलेल्या सदर नियम / आदेशाचा भंग केल्यास संबंधितास कलम १३१ (ख) (१) अन्वये आठ दिवसापर्यंत येऊ शकेल इतक्या कारावासाची शिक्षा किंवा रुपये १,२५०/- (अक्षरी एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.