जाहिरात

Crime News: मामाशी वाद, 1वर्षाच्या चिमुकल्याला पळवलं; पुढं जे घडलं.. डोंबिवलीमधील खळबळजनक घटना!

 मामासोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात अमन सकट नावाच्या तरुणाने हे आत्याच्या मुलाला चोरल्याचे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Crime News: मामाशी वाद, 1वर्षाच्या चिमुकल्याला पळवलं; पुढं जे घडलं.. डोंबिवलीमधील खळबळजनक घटना!

Dombivli Crime:  डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामासोबत झालेल्या वादाच्या रागातून एका मूकबधिर तरुणाने आपल्या आत्याच्या एक वर्षीय मुलगा चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवली. सुदैवाने डोंबिवलीत हा मुलगा सुरक्षित आढळून आला.

छत्रपती संभाजीनगरमधील हृदयद्रावक घटना! अवघ्या 2 वर्षाच्या मुलीसोबत घडलं भयंकर, घटना वाचून डोळ्यात येईल पाणी

नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, अमन सकट या मुलाने आपल्या मामाशी वाद झाल्यानंतर त्याचे एक वर्षाचे मुल उचलून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ बालकाचा फोटो व माहिती व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर प्रसारित केली. या घटनेनंतर विष्णूनगर पोलिसांना पार्किंगमध्ये एक वर्षीय बालक आढळून आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे हा मुलगा कुर्ल्यातील विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याचे समोर आले. तसेच मामासोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात अमन सकट नावाच्या तरुणाने हे आत्याच्या मुलाला चोरल्याचे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विनोबा भावे पोलीस ठाणे करत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून बालकाची ओळख पटवून त्याला कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यात पोलिसांना यश आल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार,  अमन सकट हा मूकबधिर असल्याची माहितीही समोर आली आहे.

(नक्की वाचा: Schemes for Girls: लाडक्या लेकीचं भविष्य करा सुरक्षित! 5 जबरदस्त सरकारी योजना; कसा होतो फायदा? वाचा..)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com