Dombivli News: डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवरील संकट तुर्तास टळलं; NDTV मराठीच्या वृत्तानंतर KDMC कडून आदेश

Kalyan Dombivli Municipal Corporation : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतीतील रहिवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivali News : KDMC कडून समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर आज मंगळवारी, 9 सप्टेंबरला तोडक कारवाई करण्यात येणार होती

अमजद खान, प्रतिनिधी

डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतीतील रहिवाशांसाठी (65 illegal buildings in Dombivli) एक दिलासा देणारी बातमी आहे. डोंबिवलीतील 65 बेकायदा बांधकाम प्रकरणातील एका इमारतीवर आज मंगळवार, 9 सप्टेंबरला केडीएमसीची (Kalyan Dombivli Municipal Corporation) तोडक कारवाई होणार होती. समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर ही तोडक कारवाई करण्यात येणार होती. ही कारवाई रद्द करण्यात आली आहे. 

केडीएमसी सहाय्यक आयुक्त भरत पवार यांनी याबाबत माहिती दिली. NDTV मराठी डोंबिवलीतील 65 इमारती प्रकरणाची प्रत्येक अपडेट, रहिवाशांचं म्हणणं मांडत आहे. NDTV मराठीच्या बातमी नंतर ही तोडक कारवाई रद्द करण्यात आली. 

65 इमारती प्रकरणात मंगळवारी नगर विकास विभागाकडून (Dombivli News) बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. केडीएमसी आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईत बोलवण्यात आलं होतं. कारवाई संदर्भात माहिती येताच इमारतीतील रहिवासी संतप्त झाले होते. आम्हाला बेघर का करता, ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.आमच्या घरावर कारवाई झाली तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आम्ही आत्महत्या करणार असा पवित्र रहिवाशांनी घेतला आहे. आज कारवाई झाली तर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला होता. 

नक्की वाचा - Dombivli : 65 अनधिकृत इमारतीच्या रहिवाशांना पूर्ण दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

काय आहे प्रकरण? 

डोंबिवलीतील 65 इमारतीतील घरांची विक्री झाल्यानंतर या इमारती अनधिकृत असल्याचं समोर आलं होतं. तोपर्यंत या इमारतीत लोक वास्तव्यासही आले आहेत. मरारेराकडून बनावटी कागदपत्र तयार करून ही इमारत उभारण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने या इमारतीतील रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीसही बजावली होती. त्यानंतर एका इमारतीतील नागरिकांनी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर केडीएमसीकडून या इमारतीवर तोडक कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. याविरोधात इमारतीतील रहिवाशांनीही आंदोलन पुकारलं आहे. तुर्तास तरी ही तोडक कारवाई रद्द करण्यात आली आहे. 

Advertisement