
आजच्या काळात हाडे कमजोर होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. जर तुम्हीही तुमच्या कमजोर हाडांमुळे त्रस्त असाल, तर तुम्हाला पोषणयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. कमजोर हाडे ऑस्टिओपोरोसिसमुळे होतात, जी एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे ती कमजोर होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. जर तुम्हालाही तुमची कमजोर हाडे मजबूत बनवायची असतील, तर रोज रात्री दुधात तूप मिसळून पिऊ शकता. दुधाला पोषक तत्वांचा खजिना म्हटले जाते. त्यात असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुधात तूप टाकून पिण्याचे फायदे
हाडे -
दूध हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक आहे. तुम्ही रात्री दुधात तूप मिसळून पिऊ शकता.
कमजोरी -
दूध आणि तूप दोन्ही ऊर्जा देणारे चांगले स्रोत मानले जातात. कारण दुधात प्रोटीन आणि कॅल्शियम असते, तर तूपात हेल्दी फॅट्स असतात, जे शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी मदत करतात.
सांधेदुखी -
जर तुम्हीही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल, तर रोज दुधात तूप टाकून पिऊ शकता. त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल असं सांगितलं जातं.
रोगप्रतिकारशक्ती -
रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात तूप मिसळून पिऊ शकता. कारण त्यात असलेले गुण रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात. सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती पुरवते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एनडीटीव्ही या माहितीसाठी जबाबदारीचा दावा करत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world