Driving with headphones : दुचाकी, चारचाकी किंवा कोणतंही वाहन चालवताना हेडफोन लावणं तुम्हाला महागात पडू शकतं. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी 28 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वीही अनेकदा हेडफोन घालून वाहन चालविण्याच्या घटना समोर आल्या आहेत. कित्येकदा बस चालक क्रिकेटची मॅच पाहत किंवा चित्रपट पाहत गाडी चालवत असल्याच्या तक्रारीही येत असतात. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचं संकेत आहेत. आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेले व्हॉट्सअॅप क्रमांक खुला केला जाणार आहे. कित्येकदा हेडफोन लावून दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवले जाते. यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
नक्की वाचा - Badlapur News : बदलापुरमध्ये भाजपने भाकरी फिरवली; पक्षाची जबाबदारी ज्येष्ठांकडून तरुणांकडे...
एक महिन्यापूर्वी यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र अद्याप त्यासंबंधिक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज 28 एप्रिलच्या एसटी महामंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जीव विचारला जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. याशिवाय हेडफोन लावून गाडी चालविणाऱ्यांचे व्हिडिओ किंवा छायाचित्र आरटीओकडे पाठविल्यास यावर कारवाई करणे सोपे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.