
Badlapur Political Update : बदलापूरमध्ये भाजपाच्या पक्ष संघटनेत खांदेपालट झाला असून किरण भोईर, रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे भाजपाने तरुणांच्या हाती संघटनेची धुरा सोपवल्याचं पाहायला मिळतंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपाने नुकतीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंडळ अध्यक्ष, म्हणजेच शहर अध्यक्षांची नियुक्ती केली. यामध्ये बदलापूर पश्चिम शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक किरण भोईर, बदलापूर पूर्व शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक रमेश सोळसे आणि अंबरनाथ ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते विराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
नक्की वाचा - 'फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री', 'त्या' चर्चेला शिंदेंकडून एका वाक्यात उत्तर, टेन्शन वाढणार!
यानंतर रविवारी बदलापूरच्या काटदरे सभागृहात या तिघांनाही आमदार किसन कथोरे आणि जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी तरुणांच्या हाती पक्ष संघटनेची धुरा सोपवल्याने संघटनेचं काम अधिक जोमाने होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. तर पक्षाने सोपवलेली ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू, आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवू, असं तिन्ही युवा अध्यक्षांनी सांगितलं. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजन घोरपडे, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, मावळते शहराध्यक्ष शरद तेली, संजय भोईर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world