
Dussehra Melave traffic Changes : अवघ्या दोन दिवसांवर विजयादशमीचा सण येऊन उभा ठाकला आहे. रामाने रावणाचा वध केला, देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला यानिमित्ताने देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मुंबईत गर्दीच वातावरण असं, निमित्त दसरा मेळाव्याचं. दरवर्षी शिवसेना पक्षाकडून मुंबईत दसरा मेळाव्याच आयोजन केलं जातं. यंदाही शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे होणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं सावट आहे.
दरम्यान दसरा मेळाव्यामुळे मुंबईत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांची मोठी गर्दी येत असते. त्यासाठी वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. येणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यामुळे दोन ऑक्टोबर रोजी मुंबईत अनेक मार्गात होणार बदल तर अनेक मार्गात प्रवेश बंदी असणार आहे. मोठ्या संख्येने मुंबईत गाड्या येण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांची खबरदारी घेत वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते एस बँक सिग्नल)
२. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
३. एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.
४. पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर
५. दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर
६. दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर.
७. एन. सी. केळकरमार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर
८. एल.जे. रोड, राजा बडे जंक्शन ते गडकरी
वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग
१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)
पर्यायी मार्ग :- सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.
पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शन वरून पढे गोखले रोडचा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी.
पर्यायी मार्ग :- राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४. गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.
पर्यायी मार्ग :- एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world