जाहिरात

Indian Army : भर निवडणुकीत जवानांची आठवण! शिंदेंनी दिलेला शब्द पाळला, उरणहून मोठी मदत रवाना

Eknath Shinde Fulfills Promise to Indian Army: शिवसेनेच्या वतीने 50 कंटेनर भारतीय सैन्यदलाला सुपूर्द करण्यात आले आहेत. ही मदत जवानांसाठी सुरक्षा कवच म्हणून महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Indian Army : भर निवडणुकीत जवानांची आठवण! शिंदेंनी दिलेला शब्द पाळला, उरणहून मोठी मदत रवाना
Indian Army : शिवसेनेकडून पाठवण्यात आलेल्या मदतीचा भारतीय सैन्याला मोठा उपयोग होणार आहे.
मुंबई:

Eknath Shinde Fulfills Promise to Indian Army:  राज्यात सध्या 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा धामधुमीतही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणापेक्षा राष्ट्रकर्तव्याला प्राधान्य देत भारतीय सैन्याप्रती आपली बांधिलकी जपली आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे शत्रूच्या हल्ल्यांपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने 50 कंटेनर भारतीय सैन्यदलाला सुपूर्द करण्यात आले आहेत. ही मदत जवानांसाठी सुरक्षा कवच म्हणून महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सैन्यदलाची मागणी आणि शिंदे यांचा पुढाकार

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेची सिन्दुर महारक्तदान यात्रा 10 ऑगस्ट 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये गेली होती. या यात्रेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील 1000 पैलवानांनी जवानांसाठी रक्तदान केले होते. खुद्द एकनाथ शिंदे यांनीही यावेळी रक्तदान करून जवानांचा उत्साह वाढवला होता. 

याच भेटीदरम्यान भारतीय सैन्यदलाचे ब्रिगेडियर युद्धवीर सिंह सीखों यांनी जवानांच्या सुरक्षिततेसाठी कंटेनर उपलब्ध करून देण्याची विनंती शिंदे यांच्याकडे केली होती. सीमेवरील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी ही विनंती तत्काळ मान्य केली आणि 50 कंटेनर देण्याचा शब्द दिला होता.

( नक्की वाचा : Pandharpur News : पंढरपुरात भाविकांसाठी 'फाइव्ह स्टार' व्यवस्था; स्काय वॉक, लिफ्ट आणि बरंच काही, वाचा सविस्तर )

ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी कंटेनरची मदत

'ऑपरेशन सिन्दुर' नंतर भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील युद्ध तंत्रात मोठे बदल झाले आहेत. सध्या सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोन हल्ल्यांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर तैनात असलेल्या जवानांना सुरक्षित राहण्यासाठी भूमिगत बंकरशिवाय पर्याय नसतो. 

मात्र, प्रत्यक्ष सीमारेषेजवळ सिमेंट काँक्रीटचे कायमस्वरूपी बंकर बांधणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते. यावर उपाय म्हणून कंटेनरचा वापर करून जलदगतीने बंकर उभारता येतात. यात सैनिक, अत्याधुनिक शस्त्रे आणि इतर साहित्याचे हवामानापासूनही संरक्षण करणे शक्य होणार आहे.

( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )

उरणमधून शेवटची तुकडी रवाना

50 कंटेनरपैकी 46 कंटेनर यापूर्वीच सीमेवर पाठवण्यात आले होते. उर्वरित 4 कंटेनर आज रायगडमधील उरण येथून सैन्याच्या हवाली करण्यात आले. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला होता. त्यांच्या उपस्थितीत सैन्यदलाचे अधिकारी सुभेदार सयाजी निगडे आणि नायक सुभेदार आनंद गायकवाड यांनी हे कंटेनर स्वीकारले. 

हे कंटेनर स्वखर्चाने सीमावर्ती भागात नेण्याची तयारी सैन्यदलाने दर्शवली आहे. तत्काळ मदत मिळाल्याबद्दल भारतीय सैन्यदलाने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com