Electricity Bill : 1 एप्रिलपासून विजेचं बिल कमी येणार? EV कार असणाऱ्यांनाही मोठा दिलासा

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणसाठी (MSEDCL) नवीन 'मल्टी-ईयर टॅरिफ' (अनेक वर्षांसाठीचे शुल्क) आदेश जारी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Electricity Bill : महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणसाठी (MSEDCL) नवीन 'मल्टी-ईयर टॅरिफ' (अनेक वर्षांसाठीचे शुल्क) आदेश जारी केला आहे. यामुळे पुढील पाच वर्षांत निवासी ग्राहकांच्या वीज बिलात कपात होणार आहे. सुधारित शुल्क रचनेनुसार, निवासी ग्राहकांना २०२९-३० पर्यंत वीज दरात ४% ते २६% पर्यंत कपात पाहायला मिळेल. चालू आर्थिक वर्षासाठी ही कपात १०% पर्यंत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्वरित दिलासा मिळणार आहे.

TOD सवलत सुरू राहणार...

एमएसईडीसीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान विजेच्या वापरावर टीओडी सवलत कायम राहील. या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान विजेच्या टॅरिफवर १५ टक्के आणि ऑक्टोबर ते मार्च दरम्यान २५ टक्के सवलत मिळेल. परिणामी त्यांना उत्पादनाच्या आवश्यक असलेल्या पहिल्या शिफ्ट दरम्यान वीज सवलतीच्या दरात उपलब्ध होईल. सौर ऊर्जेच्या वेळेत केलेल्या वापरावरील सवलत प्रति युनिट 0 पैशांवरून वाढवून प्रति युनिट 5 पैसे करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - LPG Gas Cylinders : पुढील 3 महिन्यांत LPG बंद होणार? LPG सिलिंडर आणि PNG बद्दल सरकारचा काय आहे प्लान? 


इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरकर्त्यांना प्रोत्साहन

निवासी क्षेत्र आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ईव्ही चार्जिंगसाठी वीज दरात कपात करण्यात आली आहे. नवीन दर १०.२२ रुपयांवरून ९.२५ रुपये प्रति युनिट करण्यात आली आहे. हा दर २०२८-२९ पर्यंत स्थिर राहणार आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळेल.


१ एप्रिलनंतर विजेचं बिल कमी येणार?

१ एप्रिलपासून आदेशाचे दुसरे वर्ष सुरू झाल्याने वीज दरात आणखी घट होईल. प्रत्येक महिन्याला १०० युनिटपर्यंत विजेचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वसाधारण टॅरिफ ७.३१ रुपयांनी घट होऊन ७.१० रुपये असेल. या ग्राहकांसाठी विजेच्या बिलात पाच वर्षात २६ टक्क्यांपर्यंट घट होईल. नवीन बहुवर्षीय वीज दर आदेशापूर्वी हा दर २०२५ पर्यंत ८.१४ रुपये होता. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.