जाहिरात

LPG Gas Cylinders : पुढील 3 महिन्यांत LPG बंद होणार? LPG सिलिंडर आणि PNG बद्दल सरकारचा काय आहे प्लान? 

राज्य सरकारही पीएनजीच्या बाबतीत अक्टिव्ह मोडवर आलं आहे आणि पीएनजीचं कनेक्शन लवकरात लवकर कसं घ्यायचं, याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

LPG Gas Cylinders : पुढील 3 महिन्यांत LPG बंद होणार? LPG सिलिंडर आणि PNG बद्दल सरकारचा काय आहे प्लान? 

LPG PNG News : इराण-इस्रायल युद्धानं काय केलं, तर तुम्ही अन्न कशावर शिजवायचं, याचे नियमच बदलून टाकलेत. आतापर्यंत बहुतांश वर्षं बहुतेक घरांचा स्वयंपाक हा एलपीजी सिलिंडरच्या मदतीनं होत होता. आता मात्र एलपीजी नको घरी लवकरात लवकर पीएनजी गॅस घ्या, असं सरकारनं सांगितलं आहे. युद्धामुळे महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

यावर उपाययोजना कशा करायच्या यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. या बैठकीत केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना पीएनजीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर एलपीजी पुढच्या काही काळात बंद होण्याचे संकेतही दिले आहेत. छगन भुजबळांनी येत्या तीन महिन्यात कदाचित एलपीजी बंद होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

राज्य सरकारही पीएनजीच्या बाबतीत अक्टिव्ह मोडवर आलं आहे आणि पीएनजीचं कनेक्शन लवकरात लवकर कसं घ्यायचं, याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

PNG च्या जोडण्या लगेच करुन घ्या

PNG साठी ज्या ज्या यंत्रणांच्या परवानग्या लागतात, त्या यंत्रणांना २४ तासांत परवानग्या देण्याचे आदेश दिलेत. एखाद्या यंत्रणेनं परवानगी दिली नाही, तरीही त्या संस्थेची परवानगी मिळाली असं समजून पीएनजी कनेक्शन तातडीनं घेण्याचे आदेश देण्यात आलेत. शेजारच्या बिल्डिंगमधून पीएनजी घेण्यासाठी त्या संबंधित बिल्डिंगला आता आक्षेप घेता येणार नाही. PNG कनेक्शनसाठी काम करणाऱ्या कामगारांना आणि यंत्रणांना २४ तास काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. PNG कनेक्शनसाठी कुठल्याही NOC ची गरज राहणार नाही. हॉटेलांनीसुद्धा तातडीनं पीएनजी कनेक्शन घ्यायचं आहे. पुढच्या काळात ज्या प्रकल्पांमध्ये PNG असेल त्या प्रकल्पांनाच ओसी द्या, अशा सूचना महापालिका, नगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. 

PNG  आणि LPG बाबत काय आहे प्लान? 

आता पुढचा प्रश्न हा की शहरांमध्ये पीएनजी कनेक्शन मिळू शकतं, पण ग्रामीण भागाचं काय?

तर जिथे पीएनजी मिळणार नाही, तिथे एलपीजी मिळेल

एखाद्या ठिकाणी पीएनजीचं कनेक्शन सहज मिळू शकतं, तरीही पुढच्या काही महिन्यांमध्ये ते घेतलं नाही तर काय होईल.

जिथे पीएनजी मिळत असूनही कनेक्शन घेतलं जाणार नाही, अशांचा PNG बंद केला जाईल

देशात ३३ कोटी एलपीजी कनेक्शन्स आहेत, तर दीड कोटी पीएनजी कनेक्शन आहे.

पीएनजी कनेक्शन लवकरात लवकर कसं मिळवायचं, यासाठी आता नागरिकांना धावाधाव करावी लागणार आहे. 

भारत एलपीजी आखाती देशांमधून आयात करतो, त्या तुलनेत पीएनजीचा साठा चांगला आहे.

त्यामुळेच भविष्यात पीएनजी कनेक्शन्स घराघरांत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर काम केलं जाणार आहे.

 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com