जाहिरात

Ellora : वेरुळच्या लेणींमधील अद्भूत किरणोत्सव; वर्षातून केवळ 2 वेळा दिसतं हे दृश्य, Video पाहून भारावून जाल!

Lord Buddha Caves: दरवर्षी १० मार्चच्या सुमारास ते अद्भतू दृश्य पाहून पर्यटकांसह इतिहासप्रेमी भारावून जातात.

Ellora : वेरुळच्या लेणींमधील अद्भूत किरणोत्सव; वर्षातून केवळ 2 वेळा दिसतं हे दृश्य, Video पाहून भारावून जाल!
file photo

Ellora Caves : जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यात वास्तुकलेचं एक अद्भूत दृश्य पाहायला मिळालं. वेरुळमधील १० व्या गुफेत भगवान बुद्धांची प्रतिमा सूर्यकिरणांनी उजळून निघाली. शेकडो पर्यटक आणि इतिहास प्रेमी हे दृश्य पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील वेरुळमध्ये हजर होते. ही दुर्लभ अशी खगोलीय घटना वर्षातून केवळ १० आणि ११ मार्च रोजी होते, यादरम्यान मावळतीच्या सूर्याची किरणं थेट गर्भगृहातील बुद्धाच्या मूर्तीचा चेहरा प्रकाशित करतात. भारावून टाकणारं ते दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते.  

वेरुळ हा एक अद्वितीय वास्तूकलेचा नमुना आहे. ज्यामध्ये ३४ बौद्ध गुफा आहेत.  गुफा क्रमांक १० ही एक 'चैत्य' आहे आणि तिला 'विश्वकर्मा मंदिर' असंही म्हणतात. दरवर्षी १० मार्चच्या सुमारास सूर्याची किरणं थेट भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर पडतात.

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व...

या गुफेत भगवान बुद्ध बोधी वृक्षाच्या खाली धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बसलेले दिसतात. त्यांच्या उजवीकडे बोधिसत्व पद्मपाणी यांच्या प्रतिमा आहेत आणि डावीकडे बोधिसत्व वज्रपाणी यांच्या प्रतिमा आहेत. गेल्या सहा-सात वर्षांत, या किर्णोत्सवाचे महत्त्व वाढले आहे आणि इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार हे दृश्य टिपण्यासाठी वेरूळ येथे मोठ्या संख्येने येत आहेत. या वर्षी उपस्थितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, गुफेच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी झाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com