जाहिरात

Tourist News: सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ, भीमाशंकर हाउसफुल! मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

गाडी लावण्यासाठी योग्य पार्किंग न मिळाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाटेल तिथे वाहने लावून पर्यटकांनी लेणी बघत भगवान श्री.घृष्णेश्वर दर्शन घेतले.

Tourist News: सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ, भीमाशंकर हाउसफुल! मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोपाळकाला, गोकुळाष्टमी आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने पर्यटकांनी घराबाहेर पडत पर्यटनस्थळी गर्दी केली आहे. विकेंड आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने लाखो पर्यटक वेरूळ येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. 

पर्यटकांच्या गर्दीमुळे  वाहनांच्या रांगाच रांगा दोन किलोमीटर पर्यंत लागल्या असल्याचे चित्र शुक्रवारी आणि शनिवारी  दिवसभर बघावयास मिळाले. यावेळी आलेल्या पर्यटकांना गाडी लावण्यासाठी योग्य पार्किंग न मिळाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाटेल तिथे वाहने लावून पर्यटकांनी लेणी बघत भगवान श्री.घृष्णेश्वर दर्शन घेतले.

Free AI Courses : जगात बोलबाला असलेल्या क्षेत्रात करिअरची संधी; सरकारकडून 5 मोफत AI कोर्सेस

 परिसरामध्ये मोठ्या संख्येने देशभरातून पर्यटक लेणी बघावण्यासाठी आलेले आहेत. याचा फायदा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या संख्येने झाला आहे. राहण्यासाठी लॉजिंग, जेवणासाठी हॉटेल्स आणि दर्शनासाठी आलेले भाविकांनी खरेदी विक्री करून येथील विक्रेत्यांचे आर्थिक गणित चांगले बसले आहे यामुळे स्थानिक नागरिकात उत्साहवर्धक वातावरण आहे.

दुसरीकडे, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरमध्ये 15 ऑगस्ट आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड मांदियाळी झाली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या असून १० किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.

दरम्यान, भिमाशंकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून भाविकांना तासंतास रस्त्यावर अडकून राहावे लागत आहे. मंदिरात पोहोचण्यापूर्वी जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर अगोदरच वाहनं पार्किंगमध्ये ठेवावी लागत असून, पुढील प्रवास भाविकांना पायी करावा लागत आहे. या सुविधांच्या अभावामुळे भाविक त्रस्त झाले असून अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Rain: दहीहंडीला पावसाची सलामी! राज्यभरात मुसळधार, कुठे काय स्थिती? वाचा सर्व अपडेट्स

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com