Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा

Facebook Viral Video: सारिका यांना याबाबत म्हटलं की, “लोक देवदर्शनाला निघाले असल्याच्या भावनेतून मदत करतात. पण हे लोक लोकांच्या भावनांचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Solapur-Akkalkot Highway Viral Video: सोलापूर-अक्कलकोट मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे. कारण या रस्त्यावर भावनिक साद घालून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जागृत प्रवासी सारिका देवरुखकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

सारिका यांनी सांगितले की, त्या कारने सोलापूर-अक्कलकोट मार्गावर प्रवास करत होत्या. रस्त्याच्या कडेला झेंडे घेऊन चालणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या गाडीला हात केला आणि गाडी थांबवली. कार थांबवल्यानंतर पायी चालणाऱ्या या लोकांना पाणी मागितले. सारिका यांनी गाडीत असलेल्या जारमधून बाटलीत पाणी भरून दिले. त्यानंतर त्यांनी खाण्यासाठी काही पैसे मागितले. सारिकाने 200 रुपये दिले, पण त्यांनी आम्ही 10-12 जण आहोत असं सांगत  आणखी पैसे मागितले. मात्र सारिका यांनाही एवढेत पैसे आहेत, असं सांगत आणखी पैसे देण्यास नकार दिला. 

पाहा- VIDEO

((नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्नातील एक घोषणा अन् PMO तील अधिकारी थेट जेलमध्ये , DCP ची स्मार्ट कामगिरी चर्चेत))

सारिका पुढे गेल्यानंतर दोन-तीन किलोमीटरवर पुन्हा अशाच प्रकारे काही लोक लोकांकडे पाणी मागताना दिसले. संशय आल्याने सारिका मागे फिरल्या आणि ज्यांना पैसे दिले होते त्यांना पुन्हा गाठलं. त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण ते पुन्हा इतरांकडे मदत मागत होते. आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांना जाब विचारला. त्यावेळी त्या लोकांनी तोंड झाकले तर काहीजण पळून गेले.

सारिका यांना याबाबत म्हटलं की, “लोक देवदर्शनाला निघाले असल्याच्या भावनेतून मदत करतात. पण हे लोक लोकांच्या भावनांचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत. अशा प्रकारामुळे खऱ्या गरजूंना मदत मिळणार नाही.  पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी, असे सारिका देवरुखकर यांना केलं आहे.

Advertisement
Topics mentioned in this article