अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महेश लांडगे यांनी एक पोस्ट केली असून त्याद्वारे त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नक्की वाचा: आयुष्यभर घड्याळ्यासोबत जगले अन् शेवटही...; विमान अपघातानंतर अशी पटली दादांची ओळख
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला होता. 28 जानेवारी रोजी अजित पवारांचे अपघाती निधन झाले. या निधनामुळे अनेकांना जबर धक्का बसला आहे. भाजप आमदार महेश लांडगेंनाही ही बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला होता. अजित पवारांच्या निधनासोबत त्यांच्यासोबत असलेली राजकीय कटुताही संपल्याचे लांडगे यांनी केलेल्या पोस्टवरून दिसून आले आहे.
महेश लांडगे यांची X पोस्ट पाहा
गुरुवारी होणार अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे. विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील असे सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारीच बारामतीमध्ये पोहोचले आणि त्यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेतली.