जाहिरात

Ajit Pawar Plane Crash : आयुष्यभर घड्याळ्यासोबत जगले अन् शेवटही...; विमान अपघातानंतर अशी पटली दादांची ओळख

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात इतका भयंकर होता की मृतदेह ओळखताही येत नव्हतं.

Ajit Pawar Plane Crash : आयुष्यभर घड्याळ्यासोबत जगले अन् शेवटही...; विमान अपघातानंतर अशी पटली दादांची ओळख

Ajit Pawar Plane Crash Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीला विमान अपघातात निधन झालं. जिल्हा परिषदेच्या रॅलीसाठी जात असताना अजित पवारांचं विमान क्रॅश झालं आणि बारामतीच्या मातीतच त्यांचा अकाली शेवट झाला. 

अजित पवार घड्याळाच्या अलार्मबरोबर पहाटे पहाटे उठायचे आणि कामाला लागायचे अशी त्यांची ख्याती होती. कधी कधी तर अजित दादा घड्याळ्याच्याही पुढे धावायचे. अजित पवारांचा कुठलाही कार्यक्रम असो, बैठक असो.... अजित पवार वेळेच्या आधीच तिथे पोहोचायचे. आयुष्यभर वक्तशीरपणा पाळलेला हा माणूस. ज्या घड्याळाशी दादा आयुष्यभर एकनिष्ठ आणि वक्तशीर राहिले. तेच घड्याळ राष्ट्रवादीचं चिन्ह होतं. काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 17 जून 1999 ला मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये 10 वाजून 10 मिनिटांनी पक्ष स्थापन करण्याची मिटिंग झाली. शरद पवारांनी चरखा या चिन्हाची मागणी केली होती. मात्र ते चिन्ह नाकारण्यात आलं. अखेर पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळालं. 

षण्मुखानंदमध्ये पक्षस्थापनेची बैठक झाली त्यावेळी घड्याळात १० वाजून १० मिनिटं झाली होती. म्हणून १० वाजून १० मिनिटं वाजलेलं घड्याळ हे राष्ट्रवादीचं चिन्ह झालं. शरद पवार आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीचं घड्याळ महाराष्टात घराघरांत पोहोचवलं. २०२३ मध्ये अजित पवार भाजपबरोबर गेले. त्यानंतर घड्याळ कुणाचं यासाठी राजकीय, न्यायालयीन लढाई लढली गेली. त्यावेळीही घड्याळानं अजित पवारांचीच साथ दिली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकाही घड्याळ चिन्हावर लढल्या.

नक्की वाचा - Maharashtra School Closed: राज्यात 3 दिवस शाळा बंद असतील? पालकांमध्ये गोंधळ, अधिकाऱ्यांनी दिली सूचना

आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार, याची चर्चा असतानाच अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतली. विमान पडलं तेव्हा विमानात कोण आहे, हे बारामतीतल्या लोकांना माहीतही नव्हतं. अजित पवारांच्या विमानाचा अपघात इतका भयंकर होता की मृतदेह ओळखताही येत नव्हतं. अखेर अजित पवारांची ओळख कशावरुन पटली? तर अजित पवारांचे कपडे आणि त्यांनी हातात घातलेल्या घड्याळावरुनच. आयुष्यभर घड्याळाशी एकनिष्ठ, वक्तशीर राहिलेल्या अजित पवारांची ओळखही त्यांच्या हातावरच्या घड्याळावरुनच झाली. मृत्यूनंतरही अजित पवारांच्या हातावरचं घड्याळ घट्ट होतं, नियतीनं वेळ मात्र चुकवली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com