नागिंद मोरे, धुळे
Dhule News : आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षीय तरुणांचं स्वप्न अपूर्णच राहिलंय. आर्मीच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. धुळे तालुक्यातील रामी येथील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अक्षय माळी असं या तरुणाचं नाव आहे. अक्षय B.sc ची शिक्षण घेत होता. तर दुसरीकडे आर्मीमध्ये भरती होण्याची तयारी देखील करत होता. अक्षयने यंदा आर्मीची परीक्षा दिली होती. मात्र अवघ्या 2 गुणांची त्याची संधी हुकली. मात्र हे अपयश अक्षयच्या जिव्हारी लागलं, त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक)
अक्षयने रामी गावालगत मोडळ नदी परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तिथे डॉ. विद्या गायकवाड यांनी अक्षयला मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या)
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. धिवरे यांना वडील यशवंत माळी यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाच्या मृत्यूने यशवंत माळी यांना देखील धक्का बसला आहे. मुलाच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. अक्षयच्या मृ्त्यूने गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.