जाहिरात

Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक

Wife murder and body stuffed in suitcase: राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचं नाव आहे. आरोपी पतील पोलिसांना अटक केली आहे. 

Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक

राहुल कुलकर्णी, पुणे

पुण्यातील 36 वर्षीय आयटी इंजिनिअर व्यक्तीने  32 वर्षीय पत्नीची बंगळुरूत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बंगळुरूतील दोड्डाकम्मनहल्ली येथील एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला. राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचं नाव आहे. आरोपी पतील पोलिसांना अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्च मॅनेजर म्हणून नोकरीला होता. तर पीडित गौरी अनिल सांबरेकर ही मास मीडियामध्ये पदवीधर होती आणि नोकरीच्या शोधात होती.  महिनाभरापूर्वीच बंगळूरुतील या घरात राहायला गेले होते. 

(ट्रेंडिंग बातमी-  Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या)

राकेशने अटकेनंतर पोलिसांना सांगितलं की, क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. मात्र भांडणादरम्यान रागाच्या भरात राकेशने गौरीवर चाकूने हल्ला केला. गौरीच्या पोटात आणि छातीत वार केले. यात गौरीचा मृत्यू झाला. यानंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून ठेवला आणि घराला कुलूप लावून पुण्यात पळून आला. गुरुवारी रात्री पुण्याजवळ त्याला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार राकेश खेडेकरने गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास बंगळूरुतील आपल्या घरमालकाला फोन करून सांगितले की, त्याने आदल्या रात्री आपल्या पत्नीची हत्या केली आहे. त्याने घरमालकाला पोलिसांना माहिती देण्यास आणि गौरीच्या कुटुंबियांना तिच्या अंत्यसंस्कारासाठी कळवण्यास सांगितले. 

(ट्रेंडिंग बातमी - Crime news: गर्लफ्रेंडवर 6 वेळा अत्याचार, वॉशिंग मशीनमुळे बॉयफ्रेंड गजाआड, नेमकं काय घडलं?)

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरलेला आढळला आणि तिच्या शरीरावर चाकूचे घाव होते. पोलीस उपायुक्त सारा फातिमा म्हणाल्या की, आरोपीला पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला बंगळुरूला आणण्यात येत आहे. त्याची चौकशी केल्यानंतर हत्येमागील हेतू कळेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: