जाहिरात

Ram Sutar : प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांचा वयाच्या 100 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

प्रसिद्ध भारतीय मूर्तीकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित राम वनजी सुतार यांचा वयाच्या 100 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

Ram Sutar : प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांचा वयाच्या 100 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव


Ram Sutar Maharashtra Bhushan Award : प्रसिद्ध भारतीय मूर्तीकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित राम वनजी सुतार यांचा वयाच्या 100 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. राम सुतार यांनी गुजरातच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी, संसदेतील महात्मा गांधी यांची बसलेली मूर्ती, अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंह, बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा, बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यासारख्या अनेक मूर्तीचं डिझाइन केलं आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राम वनती सुतार यांच्याविषयी...
राम वनजी सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात एका सर्वसाधारण कुटुंबात जाला. श्रीराम कृष्ण जोशी यांच्याकडून त्यांना शिल्पकलेची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुतार 1959 मध्ये दिल्लीला आले. येथे त्यांनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयात काम केलं. यानंतर त्यांनी फ्रीलान्स मूर्तिकाराचं काम सुरू केलं. त्यांनी दिल्लीतील लक्ष्मी नगरमध्ये एक स्टुडिओ सुरू केला आणि 1990 मध्ये नोएडात स्थिरावले.

Jitendra Joshi : 'जितू मित्रा...आभार मानायला शब्द नाहीत'; संकर्षण झाला भावुक, जितेंद्र जोशीसमोर हातच जोडले! 

नक्की वाचा - Jitendra Joshi : 'जितू मित्रा...आभार मानायला शब्द नाहीत'; संकर्षण झाला भावुक, जितेंद्र जोशीसमोर हातच जोडले! 

2004 मध्ये त्यांनी स्वत:चा स्टुडिओ स्थापन केला आणि 2006 मध्ये साहिदाबादमध्ये आपली कास्टिंग फॅक्टी स्थापन केली. आपल्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये राम सुतार यांनी संसदेच्या आत महात्मा गांधी यांच्या मूर्तीसह अनेक मूर्ती तयार केल्या. त्यांनी तयार केलेलं शिल्प इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया सारख्या अनेक देशांनाही भेट म्हणून देण्यात आले आहेत. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: