जाहिरात

Jitendra Joshi : 'जितू मित्रा...आभार मानायला शब्द नाहीत'; संकर्षण झाला भावुक, जितेंद्र जोशीसमोर हातच जोडले! 

जितेंद्र जोशीचा असाच एक किस्सा अभिनेता आणि निवेदन संकर्षण कऱ्हाडे याने शेअर केला आहे. 

Jitendra Joshi : 'जितू मित्रा...आभार मानायला शब्द नाहीत'; संकर्षण झाला भावुक, जितेंद्र जोशीसमोर हातच जोडले! 

Jitendra Joshi and Sankarshan Karhade : आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जितेंद्र जोशी याच्या मनमिळाऊ वृत्तीची मराठी अभिनय क्षेत्रात अनेकदा चर्चा होत असते. जितेंद्र जोशीने मराठीसह अनेक हिंदी चित्रपट आणि ओटीटीवरही भूमिका साकारल्या. भूमिका कमी असली तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. जितेंद्र जोशीचा असाच एक किस्सा अभिनेता आणि निवेदक संकर्षण कऱ्हाडे याने शेअर केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लवकरच संकर्षण कऱ्हाडेचं 'कुटुंब किर्रतन' नावाचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या नाट्यवर्तुळात याची मोठी चर्चाही सुरू आहे. दरम्यान संकर्षणने सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे. 

नाटकापूर्वी रंगमंदिरात एक अनाऊन्समेंट केली जाते. कुटुंब किर्रतन नाटकाची अनाऊन्समेंट ही जितेंद्र जोशीने केली आहे. यावेळी संकर्षणने सहज जितेंद्र जोशीला फोन केला..आणि जितेंद्र जोशीने कसलेही आढेवेढे न घेता ते मान्यही केलं. आणि रेकॉर्ड करून पाठवलंही. यावर संकर्षनने त्याला धन्यवाद दिले आणि आभार कसं मानू अशी विचारला केली. यावर जितेंद्र जोशीने दिलेल्या उत्तराने संकर्षण भावुक झाला. विशेष म्हणजे या पोस्टवर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एका लग्नाची पुढची गोष्टची अनाऊन्समेंट देखील तूच केली आहेस आणि त्याचा 748 वा प्रयोग झाल्याचंही सांगितलं.  

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं नृत्य नको, त्र्यंबकेश्वर संस्थानच्या कार्यक्रमावर आक्षेप; काय आहे प्रकरण?

नक्की वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं नृत्य नको, त्र्यंबकेश्वर संस्थानच्या कार्यक्रमावर आक्षेप; काय आहे प्रकरण?

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट व्हायरल...
जितेंद्र जोशी …आभार मानायला शब्द नाहीत. नाटकासाठीचा अत्यंत महत्त्वाची, नाटकापूर्वी रंगमंदिरात वाजते ती अनाऊन्समेंट… “कुटुंब किर्रतन” नाटकाची अनाऊन्समेंट कुणी करावी कुणी करावी असं सुरू असताना मनात जितेंद्र जोशी हे नाव आलं. दामले सरांच्या कानावर घातलं तेही एका क्षणांत म्हणाले डन. सकाळी ११ वा. जितेंद्र जोशींना फोन केला, म्हणालो दादा करशील का रे …? आम्ही कधीच एकत्रं काम केलं नाही.  आमचा भेटून शेक हँड सुद्धा कधी झाला नाहीये.  पण , पलिकडून उत्तर … “मित्रा …… करीन कि रे …” मी म्हणालो कधी वेळ मिळेल तुला ? उत्तर … आजच जातो. लिहिलेली अनाऊन्समेंट पाठवली.  त्यात मोलाची भर घालून जोशी बुवांनी जी काही रंगत आणली. ती तुम्हाला नाटकाच्या आधी ऐकायला मिळेल. मी फोन ठेवताना म्हणालो, कसे आभार मानू…? उत्तर आलं.. नकोच मानू… कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल त्याला अशीच साथ दे. मी निःशब्दं… काय बोलायचं? नाटक धर्माला जागणारी ही वृत्ती शिकवून येत नाही. मला खूपदा लोक विचारतात “तू मुंबईचा नाही… तुला लोकांनी कधी दूजाभाव करुन वागवलं का …???” त्याचं हे उत्तर… मला या शहरानं माझ्या कामानं अशी माणसं दिली जी एका भेटीत एक 400 पानांचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतात…मी हे कध्धीही विसरणार नाही… 
“जितेंद्र जोशी …”तुम्ही कम्माल केलीत.

जितेंद्र जोशी 'दुनियादारी' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला. त्याशिवाय 'तुकाराम' चित्रपटात त्याने तुकारामांची मुख्य भूमिका साकारली आहे. मराठीमध्ये त्याने अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकरली. त्याने अनेक वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. त्यातील Sacred Games या वेब सीरिजमधील त्याच्या कामाचं कौतुक झालं.