जाहिरात

Ram Sutar Passes Away: 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा निर्माता हरपला! शिल्पकार राम सुतार यांचे निधन

शिल्पकलेतील भिष्माचार्य अशी ओळख असलेले राम सुतार यांनी देशभरातील अनेक मोठ्या पुतळ्यांचे शिल्प साकारले.

Ram Sutar Passes Away: 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा निर्माता हरपला! शिल्पकार राम सुतार यांचे  निधन

Ram Sutar Passes Away:  आपल्या शिल्पकलेमुळे जगभरात भारताचे नाव उंचावणारे प्रख्यात शिल्पकार, पद्मभूषण राम सुतार यांचे दुःखद निधन झालं आहे. नोएडातील राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे. याचवर्षी राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 

शिल्पकार राम सुतार यांचे निधन

आपल्या अतुलनीय कलेने महाराष्ट्र तसेच देशाचे नाव जगात उंचावणारे प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे  निधन झाले आहे.  महाराष्ट्रातील धुळे येथे राम सुतार १९ फेब्रुवारी 1925 मध्ये यांचा जन्म झाला.  जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिल्पकलेचे धडे घेतले.  शिल्पकलेतील भिष्माचार्य अशी ओळख असलेले राम सुतार यांनी देशभरातील अनेक मोठ्या पुतळ्यांचे शिल्प साकारले. तब्बल 450 शहरांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळे उभारणीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले. 

Sangli Politics: काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राम सुतार यांना 1999 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 2018 मध्ये पद्मभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला. संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासह, स्टॅच्यू ऑफ युनिटीसारख्या गगणाला भिडणाऱ्या पुतळ्यांचे शिल्प त्यांनी साकारले. जगभरातील ४५० शहरांमध्ये त्यांनी साकारलेले पुतळे उभारण्यात आले. 

गगणाला भिडणाऱ्या मुर्तींचे शिल्पकार

त्यांनी संसद भवनातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची रचना केली होती, जी विविध देशांना भेट म्हणून देण्यात आली आहे. अयोध्येतील  भगवान श्री राम आणि वीणाची २५१ मीटर उंचीची मूर्तीही त्यांनीच साकारली आहे. भगवान शिवाची बंगळुरुमधील 153 फुटांची मूर्ती ही राम सुतार यांनीच साकारली आहे. त्याचबरोबर अलिकडेच पुण्यातील मोशी येथे उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांची 100 फुटांची मूर्तीही राम सुतार यांनीच तयार केली. 

Manikrao Kokate : कोकाटेंचा गेम ओव्हर ! मुख्यमंत्र्यांनी पंख छाटले, अटक वॉरंटनंतर झाला मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com