FASTag Annual Pass : FASTag च्या वार्षिक पासची धूम, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक एन्ट्री

पासधारकांना प्रवासादरम्यान काही अडचणी येऊ नये यासाठी सर्व टोल प्लाझावर NHAI अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

FASTag Annual Pass : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरील सुमारे 1150 टोल प्लाझावर FASTag चा वार्षिक पास सुरू केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांकडून या वार्षिक पासला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 15 ऑगस्ट रोजी वार्षिक पास लाँच झाला. याच्या पहिल्या दिवशी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सुमारे 1.4 लाख वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केला आणि वापरही केला आहे. टोल प्लाझावर सुमारे 1.39 लाख व्यवहार नोंदवले गेल्याचीही माहिती आहे. 

NHAI नुसार, सद्यसथितीत 20 ते 25 हजार वर्तमान वापरकर्ते राजमार्गयात्रा अॅपचा उपयोग करीत आहेत. पासधारक जेव्हा टोल प्लाझा ओलांडतात तेव्हा टोल शुल्कातून शून्य कपात झाल्याचा एसएमएस येतो.  

महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पासधारकांना प्रवासादरम्यान काही अडचणी येऊ नये यासाठी सर्व टोल प्लाझावर NHAI अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. NHAI चे अधिकारी  विविध माध्यमातून पासधारकांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. तसेच, पासधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 1033 राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइनवर 100 हून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Bank Minimum Balance : मिनिमम बॅलेन्ससाठी कोणत्या बँकेकडून किती चार्ज? कुठे फ्री, पाहा पूर्ण यादी

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास करणाऱ्यांना सोपं आणि परवडणारा पर्याय देत FASTag चा एका वर्षाचा पास ३००० रुपयांपर्यंत देण्यात आला असून यामुळे २०० टोल प्लाजा क्रॉसिंगची सुविधा देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून एकत्रित पैसे देऊन फास्टॅग वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. फास्टॅग वार्षिक पास बिगर-व्यावसायिक वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. हायवे यात्रा अॅप किंवा एनएचएआय वेबसाइटवर पैसे देऊन ते दोन तासांच्या आत सुरू केले जाऊ शकतात. 

तब्बल ९८ टक्के एन्ट्री रेट आणि ८ कोटीहून अधिक युजर्ससह Fastag ने देशात इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन यंत्रणेत बदल केला आहे. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक पासच्या माध्यमातून फास्टॅग वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला होईल. त्यांना प्रवासादरम्यान आराम मिळाले. वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून सुटका होईल. यासोबतच नॅशनल हायवे आणि एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणं जास्त सोईचं असेल. 

Advertisement