अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला कॉन्स्टेबल अटकेत, भोंदू बाबाच्या टोळीशी कनेक्शन उघड

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत यांच्या कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात सुमारे 85 लाखाच्या फसवणूक व नरबळी जादूटोणाप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील पोलीस चालक कर्मचारी श्रीमती तृप्ती संजय मुळीक हिचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी निलंबन केले आहे. तिला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी तिच्या निलंबनाची कारवाई केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत यांच्या कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली होती. कोल्हापूर येथील या फसवणूक प्रकरणात तिचा हात असल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.

गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलीस ठाण्यात आपल्याला झालेल्या फसवणूक प्रकरणात 3 नोव्हेंबर 2024 रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार एकूण 9 संशयितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलीस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक (वय 32)  6 नंबरची संशयीत आरोपी आहे. 

( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )

तृप्ती मुळीक हिच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत, असे एकूण 9 आरोपी आहेत. या सर्वांवर भादवि कलम 384, 386, 419,420, 34 सह नरबळी इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा आधीचा वापर करून 84 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )

24 लाख 85 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, 2 लाख 80 हजार किमतीचे चांदीचे दागिने व किमती वस्तू, 54 लाख 84 हजार रोख रक्कम व आरटीजीएस रक्कम, 2 लाखांचे लाकडी व किमती सामान व 20 हजार किमतीची परवाना बंदूक अशी रोख रक्कम व दागिन्यां सह किमती सामान फसवणूक करून दबाव टाकून घेतल्याचे व यात आपली या संशयित आरोपींनी फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

अटक झालेली तसेच आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातून निलंबन झालेली तृप्ती मुळीक हिला न्यायालयाने 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 3 दिवसाच्या पोलीस कोठडीमुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार तिचे निलंबन करण्यात आले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article