Beed News: मैत्रिणीच्या घरी राहायला गेली अन् घात झाला? महिला होमगार्डची निर्घृण हत्या

Beed Crime News : बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अयोध्या व्हरकटे नावाच्या एका महिलेच्या बेपत्ता असल्याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

Beed News : बीड शहरात महिला होमगार्डचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या महिलेचा मृतदेह शहरातील एका नाल्यात आढळून आला आहे. महिला पोलीस भरतीचा देखील सराव करत होती आणि काही महिन्यांपूर्वीच होमगार्ड म्हणून रुजू झाली होती.

बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अयोध्या व्हरकटे नावाच्या एका महिलेच्या बेपत्ता असल्याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. काल तिचा मृतदेह बीड शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

(नक्की वाचा-  खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या व्हरकटे यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. अयोध्या व्हरकटे या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होती.

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, अयोध्या तीन दिवसांपूर्वी बीडमधील अंबिका चौक परिसरात तिच्या एका मैत्रिणीच्या घरी आली होती. याच मैत्रिणीने आणि तिच्यासोबत असलेल्या अन्य चार जणांनी मिळून अयोध्याच्या खुनाचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)

शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत दोन संशयितांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article