देवा राखुंडे
इंदापूरात कारचा टायर फुटून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज जवळ हा अपघात झाला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ब्रिझा गाडीला हा अपघात झाला आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला गेलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे कडून सोलापूरच्या दिशेने कार निघाली होती. ही कार डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यानंतर ही गाडी 50 मीटर जमिनीला घासत गेली. त्यानंतर गाडीने पाच ते सहा पलटी मारल्या. त्यानंतर ही गाडी ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला आदळी. त्यानंतर ती नाल्यात जावून पडली. अपघाता वेळी गाडीत सहा जण होते. त्या पैकी पाच जण हे जागेवरच ठार झाले. तर एक जण उपचारादरम्यान मरण पावला.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ
इरफान पटेल वय 24 वर्षे, मेहबूब कुरेशी ,वय 24 वर्षे , फिरोज कुरेशी, वय 26 वर्षे , हे जागीच ठार झाले. तर रफिक कुरेशी वय 34 वर्षे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सय्यद इस्माईल अमीर ह्याला किरकोळ मार लागला आहे.सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेडचे आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.