Pune Goodluck Cafe : गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरत्या काळासाठी निलंबित; FDA ची मोठी कारवाई

बन मस्क्यात काचेचे आढळल्यामुळे 'गुडलक कॅफे'चा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केला आहे. तर पुढील तपासासाठी नमुने घेण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध फूड जॉइंट गुडलक कॅफेमधील (Goodluck Cafe's license suspended) सर्वांचं आवडतं खाद्यपदार्थ बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. पुण्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात या कॅफेमध्ये येत असतात. तरुणाई वर्गात गुडलक कॅफेविषयी मोठी क्रेझ आहे. त्यामुळे बन मस्क्यात काचेचा तुकडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. 

तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार 

डेक्कन परिसरातील गुडलक कॅफेमध्ये एक दाम्पत्य नाश्त्यासाठी गेले असता, त्यांनी घेतलेल्या बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळले. या दाम्पत्याने या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, अद्याप पोलीस तक्रार दाखल झालेली नाही, असे डेक्कन पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा - Pune Mumbai Shivneri driver : पुणे-मुंबई शिवनेरीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात; दारूचे घोट घेत घेत चालवली बस...

बन मस्क्यात काचेचे आढळल्यामुळे 'गुडलक कॅफे'चा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केला आहे. तर पुढील तपासासाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असं सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सुरेश अन्नपुरे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

आकाश जलगी हे आपल्या पत्नीसह कॅफे गुडलकमध्ये गेले होते. त्यांनी चहा बन मस्काची ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यावर ते चहा घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की बन मस्का ज्या डिशमध्ये दिला, त्यामध्ये काचेचे तुकडे त्यांना दिसले. सुरूवातील बर्फ वाटला होता. पण त्यांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बर्फाचे तुकडे नसून काचेचेच आहेत. यानंतर त्यांनी व्हिडीओ तयार केला. कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता, त्यावेळी त्यांच्याकडी काही उत्तर नव्हतं.

Topics mentioned in this article