जाहिरात

Shalinitai Patil : राजकारणातील 'क्रांतिसेना' शांत; माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Former Maharashtra Minister Shalinitai Patil Passes Away : माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे.

Shalinitai Patil : राजकारणातील 'क्रांतिसेना' शांत; माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
Shalinitai Patil : साताराजिल्ह्यातील कोरेगावमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
मुंबई:

Former Maharashtra Minister Shalinitai Patil Passes Away at 94:  माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईतील माहिम येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असलेल्या शालिनीताई यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी आणि करारी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. साताराजिल्ह्यातील कोरेगावमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

कोण होत्या शालिनाताई पाटील?

शालिनीताई पाटील यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि चर्चेचा राहिला आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1980 च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

 त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1990 मध्ये जनता दलातून आणि 1995 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते.

( नक्की वाचा : Ambernath Nagarparishad Election 2025: लग्नाचे वऱ्हाड की बोगस मतदार? अंबरनाथमधील त्या 208 महिलांचे गुपित काय? )

सामाजिक कार्यातही योगदान

केवळ राजकारणच नव्हे तर सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर होत्या. 1970 च्या दशकात त्यांनी गरीब रुग्ण आणि महिलांच्या कल्याणासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली होती. शालिनीताई या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जात असत, विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी नेहमीच आपली भूमिका ठामपणे मांडली. महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

राजकीय प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर त्यांनी टीका केली होती. त्यांची भूमिका तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाविरोधात असल्याने शरद पवार यांनी 2006 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी क्रांतिसेना महाराष्ट्र या नावाच्या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. मात्र या पक्षाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि कालांतराने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com