Maoists surrender :गडचिरोलीतून नक्षलवाद जवळपास संपुष्टात; माओवादी चळवळीच्या इतिहासातील सर्वात मोठं आत्मसमर्पण

6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती याच्यासह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस अधिक्षकांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलवादीविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातून माओवादी जवळपास संपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती याच्यासह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस अधिक्षकांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. माओवादी चळवळीच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आत्मसमर्पण मानलं जात आहे. माओवाद्यांच्या सर्वोच्च नेत्याने यावेळी आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली पोलिसांचं आणि राज्य सरकारचं मोठं यश मानलं जात आहे.