गडचिरोलीतील मन हेलावून टाकणारी घटना; आदिवासींच्या समस्या कधी संपणार? 

गडचिरोलीतून पुन्हा एकदा धक्कादायक दृश्य समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Gadchiroli News : गडचिरोलीतून पुन्हा एकदा धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेल्या पेंदुळवाही या छोट्याशा गावात एक गंभीर आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा उजेडात आल्या आहेत.

मनिराम रामा हिचामी हा 35 वर्षीय शेतकरी आपल्या शेतात धानाची रोवणी करण्यासाठी टॅक्टरच्या मदतीने चिखल तयार करण्याचं काम करीत होता.  दरम्यान, चिखलात टॅक्टर घसरून अडकला आणि अचानक तो उलटला. या अपघातात मानिरामच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. 

या घटनेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी लगेच रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र दुर्दैव असे की, जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात या गंभीर वेळेस एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे मानिरामला चक्क एका खाटेवर झोपवून 3 किलोमीटरचा खडतर जंगलमय रस्ता पार करून कसुरवाही गावापर्यंत आणण्यात आलं. तिथून वाहनाने जारावंडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मनिरामला गडचिरोलीतील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.  ही बाब प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक आहे.

Advertisement

नक्की वाचा - Gadchiroli News : स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर नक्षलवादी नियंत्रित गावात पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांमध्ये उत्साह

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेशी साधनसामग्री, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि वेळेवर मिळणाऱ्या रुग्णवाहिकेचा अभाव या समस्या वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर आजाराच्या वेळी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अवस्था अशी बिकट असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Topics mentioned in this article