
गडचिरोलीतून (Gadchiroli News) एक चांगली बातमी समोर आली आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पहिल्यांदाच बस सेवा पोहोचली आहे. अबुझमाडजवळील मारकनारमधील गावकऱ्यांची पायपीट आता संपली असून त्यांना बसमधून इच्छितस्थळी पोहोचता येणार आहे. एकेकाळी या गावात नक्षलवाद्यांचं (first bus in Naxalite area) शासन होतं. आता 78 वर्षांनंतर येथे राज्य सरकारची बस पोहोचली आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्यासाठी हे सर्व स्वप्नवत आहे.
हे गाव गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आहे. येथील तब्बल शंभर आदिवासींसाठी ही बस एक मोठी बाब आहे. काही काळापर्यंत तर येथे मोबाइल आणि आधार कार्डसारख्या गोष्टीही नव्हत्या. आता थेट बस आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पायी चालत कोठी गावापर्यंत जात...
राज्य रस्ते परिवहन विभागाद्वारे ही बस चालवली जाणार आहे. या बसमुळे मारकनार आणि जवळपासच्या गावांना मोठा फायदा होईल. आता या गावकऱ्यांना सहा किलोमीटर पायी चालत कोठी गावापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. कोठीमध्ये अहेरीतून येणारी बस रात्री थांबत होती आणि दुसऱ्या दिवशी प्रवाशांना परत घेऊन जात होती. मारकनारशिवाय मुरंबाहुशी, फुलनार, कोपरशी, पोयारकोठी आणि गुंडुरवाडी सारख्या गावातील जवळपास एक हजार गावकऱ्यांना या बस सेवेचा लाभ मिळेल. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
नक्की वाचा - Akola News : अकोल्याचा देशपातळीवर डंका; कापूस उत्पादनात मोठी कामगिरी करणारा देशातील एकमेव जिल्हा
नक्षलवाद्यांचं मुख्यालय...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 मे रोजी मन की बात कार्यक्रमात गडचिरोलीच्या काटेझारीमध्ये बस सेवा सुरू केल्याबद्दल कौतुक केलं होतं. त्यांच्या भाषणानंतर गडचिरोली पोलीस आणि प्रशासनाने आणखी एक पाऊल उचललं होतं. त्यांनी मारकनारपर्यंत बस सेवा सुरू केली. हे गाव अबूझमाडच्या जवळ आहे. जो नक्षलवाद्यांचा मुख्यालय म्हणून ओळखला जात होता.
तिरंगा घेऊन बसचं स्वागत...
शाळेच्या मुलांमध्येही आपल्या गावात बस येणार असल्याने आनंदाचं वातावरण आहे. त्यांनी हातात तिरंगा घेऊन बसचं स्वागत केलं. त्यांचे आई-वडिलही ढोल घेऊन सरकारच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. पुढील वर्षी ही बस मुरंबाहुशीपर्यंत जाईल. काही वर्षांपर्यंत येथून केवळ गोळ्या आणि बॉम्ब स्फोटाचं आवाज ऐकू येत होते.
गावबंदी योजनेचा लाभ..
भामरागड विभागाचे एसडीपीओ अमर मोहिते यांनी सांगितलं की, मारकनार आणि जवळपासच्या भागात सरकारच्या गावबंदीची योजना लागू झाल्यानंतर MSRTC ची बस सेवा सुरू झाली. गावबंदीचा अर्थ आहे, गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना गावात फिरण्यास मनाई केली. याच्या बदल्यात सरकारने गावात विकास कामं घडवून आणले. कमांडोंनी नक्षलवाद्यांना तो भाग सोडून जाण्यास, रस्ते बांधणी आणि मोबाइल टॉवर लावण्यास मदत केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world