जाहिरात

Ganpati Festival 2025 Train Ticket Booking: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! आजपासून तिकीट बुकिंग सुरु; वाचा A टू Z माहिती

Ganpati Special Train Booking Details: आगमनापूर्वी शुक्रवार-शनिवार-रविवार अनुक्रमे 22, 23 आणि 24 ऑगस्ट आहेत. या दिवशी रेल्वे प्रवासाचे आरक्षण सोमवार म्हणजेच 23 जूनपासून सुरू होईल.

Ganpati Festival 2025 Train Ticket Booking: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! आजपासून तिकीट बुकिंग सुरु; वाचा A टू Z माहिती

Ganeshotsav 2025 Konkan Railway Ticket Booking: लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा दोन महिन्यांवर आला आहे. अशातच आता कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवाला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग (Train Ticket Booking) सोमवारपासून सुरू होईल. यावर्षी बुधवार २७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. आगमनापूर्वी शुक्रवार-शनिवार-रविवार अनुक्रमे 22, 23 आणि 24 ऑगस्ट आहेत. या दिवशी रेल्वे प्रवासाचे आरक्षण सोमवार म्हणजेच 23 जूनपासून सुरू होईल.

गणेशोत्सवासाठी मुंबईतील लाखो लोक कोकणातील (Konkan Ganpati Festival) त्यांच्या मूळ गावी जातात. उत्सवानिमित्त अतिरिक्त एसटी आणि खाजगी एसटी चालवल्या जातात. कोकणात रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे प्रवास आरामदायी, स्वस्त आणि जलद आहे. या कारणास्तव कोकणातील लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वेच्या तिकीट बुकिंगसाठी आता चाकरमान्यांची लगबग सुरु झाली असून आजपासून बुकिंग सुरु करण्यात आली आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोणत्या दिवशी कोणते बुकिंग होणार? (Ganpati Ticket Booking Process)

 22 ऑगस्ट रोजी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिकिटांचे बुकिंग 23 जून (सोमवार) रोजी करता येणार आहे. त्याचबरोबर 23 ऑगस्टचे तिकीट २४ जूनला (मंगळवार), 24 ऑगस्टचे तिकीट 25 जूनला (बुधवार), 25 ऑगस्टचे तिकीट 26 जूनला (गुरुवार), 26 ऑगस्टचे तिकीट 27 जूनला (शुक्रवार), 27 ऑगस्टचे तिकीट 28 जूनला (शनिवार), 28 ऑगस्टचे तिकीट रविवारी 29 जूनला  बुक करता येईल.

अधिकृत अ‍ॅप कोणते?
ट्रेन कोणत्या स्टेशनवर पोहोचली आहे हे जाणून घेण्यासाठी 'नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम' (एनटीईएस) आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा. ट्रेनचे लाईव्ह लोकेशन, मार्ग नकाशा, ट्रेनचे वेळापत्रक, मार्गावरील थांबे आणि स्टेशन्स यासारखी माहिती त्यात दिली जाते.

Railway news: आता धावत्या ट्रेनमध्येही मिळू शकते कन्फर्म सीट! खूप कमी जणांना माहिती आहे तिकीट बुकिंगची ही पद्धत

तिकीट बुकिंग करताना हे लक्षात ठेवा

तिकीट बुक करताना मूळ स्थानकावरून ट्रेन सुटण्याच्या दिवसाचा विचार करावा. महाराष्ट्रातील स्थानकांवरून उत्तर आणि दक्षिण भारतातून सुटणाऱ्या गाड्यांसाठी एक दिवस अगोदर आरक्षण करावे लागेल.  जर तुम्हाला 26 ऑगस्ट 2025 रोजी कल्याण ते खेड/चिपळूण/कणकवली असा प्रवास करायचा असेल तर आरक्षण 26 जून 2025 रोजी सुरू होईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला 3 सप्टेंबर 2025 रोजी कुडाळ/रत्नागिरी/संगमेश्वर/चिपळूण/खेड ते पनवेल/कल्याण/मुंबई असा प्रवास करायचा असेल तर आरक्षण 4 जुलै 2025 रोजी सुरू होईल.

वेळेकडे लक्ष द्या!

रात्री 12 वाजल्यानंतर वेळेकडे लक्ष द्या, दिवस बदलतो. म्हणून मध्यरात्रीच्या गाड्यांसाठी तुम्ही दुसऱ्या दिवसाचे तिकीट घ्यावे. जर तुम्हाला गुरुवारी रात्री प्रवास करायचा असेल तर तुम्ही ११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस किंवा ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस खरेदी करावी, तुम्ही शुक्रवारचे तिकीट घ्यावे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com