
Mumbai to Konkan Ro Ro Ferry: लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लवकरच मुंबईतील चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग सुरु होणार आहे. कोकणात जाणाऱ्या या चाकरमान्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझगाव-मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होणार आहे. ज्याचा मुहूर्तही आता ठरला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईहून विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग ही रो रो सेवा सुरु करण्याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी (Ganesh Chaturthi 2025) दोन- तीन दिवस आधी ही रो रो सेवा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग बंदर विभागाकडून विजयदुर्ग जेटीवर युद्धपातळीवर याचे काम वेगाने सुरू आहे.
Raksha Bandhan 2025 : लाडके भाऊ 7 तास रेल्वे स्थानकावर; रक्षाबंधनासाठी सोडणारी विशेष ट्रेन लेट
मुंबई ते मांडवा अशी रो रो सेवा देणाऱ्या एम टू एम कंपनीची एक बोट मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर धावणार आहे. देवगड, मालवण, राजापुरला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही बोट फायदेशीर ठरणार आहे. कोकण रेल्वेने हाच प्रवास करण्यासाठी १३- १४ तासांहून अधिक वेळ लागतो, जो आता अवघ्या सहा तासांवर येणार आहे. या रो रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सागरी महामंडळाने व्यक्त केला आहे.
किती असेल तिकीट दर?
मुंबईवरून विजयदुर्गला येण्यासाठी या M2M बोटीचे अंदाजित तिकीट किती असेल? याबाबतची माहितीही आता समोर आली आहे. या बोटीमध्ये जनरल प्रवाशी भाडे--600 ते 1000 रुपये इतके असेल तर गाडी भाडे-1500 ते 2000 पर्यत असणार आहे. वरील दर हे अंदाजित आहेत. लवकरच दर निश्चित करुन जाहीर करण्यात येतील, अशी माहितीही महामंडळाकडून देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world