आकाश सावंत, बीड:
Beed News: प्रवासात बस उशिरा येणं, तासनतास वाट पाहायला लागणं सर्वात कंटाळवाणे काम. बसची वाट बघत स्थानकात बसून राहणे ही कोणत्याही प्रवाशासाठी त्रासदायक बाब असते. मात्र बीड बसस्थानकामध्ये बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना एक वेगळाच अनुभव आला. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने भरलेले बसस्थानक अचानक छोट्याशा रंगमंचात बदललं आणि लावणीचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं? वाचा...
बसस्थानकामध्ये रंगली लावणी
वेळ रात्री आठ वाजताची. ठिकाण बीड बसस्थानक, अचानक तीन चिमुकल्या मुलींनी बीड बसस्थानकामध्ये लावणीचा ठेका धरला अन् प्रवाशांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. झालं असं की बाल नृत्य कलाकार वैभवी टाखनकार आणि तिच्या दोन मैत्रिणी कुटुंबासोबत बीडहून माजलगावकडे आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर थांबल्या होत्या.
Pune Crime: मांजर, पोपट, पिंजरा.. दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी, पुण्यातील धक्कादायक घटना
संध्याकाळचे सुमारे आठ वाजले होते. बस उशिरा असल्याने सर्व प्रवाशी प्रतीक्षेत होते. याच वेळी प्रवाशांचं मनोरंजन करण्यासाठी या तिन्ही बाल कलाकारांनी अचानक लावणीच्या गाण्यावर ठेका धरला. गर्दीने गजबजलेल्या स्थानकात अचानक या बालकलाकारांनी ठेका धरल्याने सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. बस स्थानकात असलेले प्रवासी बसची वाट बघण्याचा त्रास विसरुन हा डान्स बघण्यात रमले.
प्रवाशांसाठी ठरला अविस्मरणीय क्षण
त्यांच्या अचूक हालचाली, आत्मविश्वास आणि नृत्यकौशल्य पाहून बसस्थानकातील प्रवाशी अक्षरशः थक्क झाले. काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला,i तर अनेकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या चिमुकल्यांना भरभरून दाद दिली. दरम्यान बसस्थानकावर घडलेला हा अनपेक्षित “लावणीचा जल्लोष” प्रवाशांसाठी अविस्मरणीय ठरला.