जाहिरात

Mumbai News: मुंबईकरांसाठी खुशखबर! गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कधी सुरु होणार? मोठी अपडेट समोर

विविध दिशांना जाणारी वाहतूक विनासायास वळवता येईल. तसेच, सुरक्षिततेचा विचार करून पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त पादचारी मार्गही देण्यात आले आहेत.

Mumbai News: मुंबईकरांसाठी खुशखबर! गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कधी सुरु होणार? मोठी अपडेट समोर

Goregaon Mulund Link Road News: मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.  मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'गोरेगाव-मुलुंड लिंक रोड' प्रकल्पाचा पहिला टप्पा या महिनाअखेर किंवा जूनच्या सुरुवातीला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे दिंडोशी आणि गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ​या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे १.२ किमी लांबीचा उन्नत उड्डाणपूल आहे. हा पूल पश्चिम उपनगरातील दिंडोशी कोर्टाजवळून सुरू होऊन गोरेगावमधील फिल्म सिटी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) येथे संपतो.

Yavatmal News : 9 दिवसांनी स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला; अन्वीच्या मृत्यूनंतर प्रशासनाची पळापळ!

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये:

हा उड्डाणपूल सहा पदरी (Six-Lane) असून, याद्वारे वाहनांची ये-जा वेगाने होणार आहे. या पुलाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'एलिव्हेटेड रोटरी'. एका उंचावलेल्या प्लॅटफॉर्मवर वर्तुळाकार छेदनबिंदू (Rotary) तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे विविध दिशांना जाणारी वाहतूक विनासायास वळवता येईल. तसेच, सुरक्षिततेचा विचार करून पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त पादचारी मार्गही देण्यात आले आहेत.

​वाहतूक कोंडीतून मुक्ती

सध्या दिंडोशी आणि फिल्मसिटी परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हा पूल सुरू झाल्यामुळे हा वेळ वाचणार आहे. एकूण १२.२ किमी लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पात पुढे भुयारी मार्ग आणि मोठ्या पुलांचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगर थेट मुलुंड आणि पूर्व उपनगरांशी जोडले जाईल, ज्यामुळे मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेत मोठे परिवर्तन अपेक्षित आहे.

दरम्यान, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण 12.2 किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते अशा  सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा दुवा गोरेगाव परिसराला दक्षिण मुंबईशी तसेच मुलुंड परिसराला पूर्व मुंबईशी थेट जोडणारा असेल. या प्रकल्पाचे काम चार टप्प्यांमध्ये विभागले गेले असून त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आहे.

नक्की वाचा - Sambhajinagar : विहीर बनली दफनभूमी; संभाजीनगरमधील 2 सख्ख्या भावांसह वडीलही गाडले गेले, गाव हादरलं!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com